Download App

राष्ट्र उभारणीत सहभागी व्हा! आयुष्मान खुराना आणि पी.व्ही. सिंधूचे तरुणांना आवाहन

  • Written By: Last Updated:

Ayushmann Khurrana and P.V. Sindhu appeal to youth : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 – ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ ची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी दिल्लीत भारत मंडपम येथे होणार आहे.आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि पी.व्ही. सिंधूने (P.V. Sindhu) तरुणांना राष्ट्र उभारणीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

या संवादाचा भाग होण्यासाठी 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांनी ‘विकसित भारत चॅलेंज’ मध्ये भाग घ्यावा लागेल. या चॅलेंजचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून क्विझमध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर आहे. तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी, तरुण आयकॉन आयुष्मान खुराना आणि पी.व्ही. सिंधू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीयांना या चॅलेंजमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित केले आहे.

आयुष्मानने पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय कोणाला दिलं? म्हणाला,’त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली…’

या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी 1 लाख नव्या तरुणांना, ज्यांचे राजकारणात कोणतेही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, त्यांना राजकारणात आणण्याची घोषणा केली होती. यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 ला ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ म्हणून पुनर्कल्पित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात निवडलेल्या संघांना आणि सहभागींना आपली ‘विकसित भारत’ ची दृष्टी पंतप्रधान मोदींच्या समोर सादर करण्याची संधी मिळेल.

परळीत 120 बुथवर बोगस मतदान; राजेसाहेब देशमुखांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

अभिनेता आयुष्मान खुराना याने यासंदर्भात त्याच्या अधिकृत X सोशल मीडिया हॅंडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटलंय की, ‘क्विझ खेलो, पीएम साब से मिलो’ आणि विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये आपल्या सशक्त भारताच्या कल्पना शेअर करा. माय भारत प्लॅटफॉर्मवर 25 नोव्हेंबरपासून विकसित भारत क्विझमध्ये सहभागी व्हा आणि विकसित भारत संवादासाठी निवड होण्यासाठी तुमचा प्रवास सुरू करा.

 

follow us