परळीत 120 बुथवर बोगस मतदान; राजेसाहेब देशमुखांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

परळीत 120 बुथवर बोगस मतदान; राजेसाहेब देशमुखांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Rajesaheb Deshmukh Allegations On Dhananjay Munde : राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) पार पडली. यावेळी परळी (Parli) मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राजसाहेब देशमुख यांनी भाजप नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांचा पराभव झालाय, तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विजयी झाले आहेत. दीडशे मतदारसंघात मृत लोकांचं मतदान झालंय. अशी हजारो मतं आहेत. मृत लोकांनी वरून येवून खाली मतदान केलं आणि पुन्हा वर गेलेत अशी टीका राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलीय.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. परळी मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था ही गोष्ट राहिलेली नाही. परळीतील जनतेत भीतीचं वातावरण आहे. सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी भयभीत झालेला आहे. प्रत्येक सामान्य माणसाला देखील मतदान केंद्रावर देखील मतदानाला येवू दिलं जात नाही. तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये दिसतंय की, माझ्या बॉडीगार्डला मारहाण केली जातेय. कायदाच नसेल, जर एकच माणूस बटण दाबीत असेल तर तो कितीही मतांनी निवडून येवू शकतो.

एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन चेहऱ्याकडे राज्याचे लक्ष

मतदान केंद्रावर पोलीस त्यांचेच, कायदा त्यांचाच. जर याच पद्धतीने करायचं असेल तर निवडणुक कशासाठी घेता? असा सवाल देखील राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित केलाय. कशाला सरकारचे पैसे खर्च करता? यांना घोषित करून टाका. एकच माणूस मतदान करत होता, यासंदर्भात दहा व्हिडिओ दिलेले असल्याचं देखील राजेसाहेब म्हणाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा बघा, दहा पुरावे आहेत असं ते म्हणाले आहेत.

दिल्लीतून मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर शिक्कामोर्तब! अमित शाह घोषणा करणार, एकनाथ शिंदे नाराज?

पुढील पाऊल म्हणजे लोकशाही मार्गाने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू, असं देखील राजेसाहेब देशमुख म्हणाले. 140 ते 150 बूथवर मृत लोकांचे मतदान झालं आहे, असे हजारो मतं असल्याचं देशमुख म्हणाले आहेत. पत्र पाठवून देखील निवडणूक आयोगाने यासंदर्भात काहीही सांगितलेलं आहे. या महाराष्ट्रात कालच्य विधानसभेत जनता नाराज असताना देखील मतं मिळाली कशी, असं राजेसाहेब देशमुख म्हटले आहेत. तर राजेसाहेब देशमुख यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनाच मारहाण होवून त्यांचे जवळचे सर्व लोक जेलमध्ये असल्याची देखील माहिती मिळतेय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube