आरोपी माझा संतोष देशमुख पार्ट 2 करणार होते, शिवराज दिवटेनं सांगितली आपबिती…

आरोपी माझा संतोष देशमुख पार्ट 2 करणार होते, शिवराज दिवटेनं सांगितली आपबिती…

Beed Crime : शुक्रवारी संध्याकाळी परळी येथे शिवराज दिवटे (Shivraj Divate) नावाच्या तरुणाला एका टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेने बी (Beed) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सगळ्या प्रकारानंतर शिवराजने शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच टोळक्यातील काही जण याचा संतोष देशमुख (Santosh Deshmukh) पार्ट 2 करायचा असं म्हणत होते, असंही शिवराजने सांगितलं.

Beed Crime : शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका; SP कॉवत यांचे आवाहन

माध्यमांशी बोलताना शिवराज म्हणाला, मी जलालपूर येथे माझ्या मित्रासोबत जेवायला गेलो होतो. जेवणानंतर तिथं काही भांडण लागले होते. तिथ मी भांडणं पाहायला उभा होता. त्यानंतर मित्राने मला परळीला सोडून दिलं. मी रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात होतो, हे मारणाऱ्यांना माहित होतं. पेट्रोल पंपाजवळ तर पाच गाड्यावरील पोरांनी माझा रस्ता अडवत मला मारहाण केली. ते मला रत्नेश्वर डोंगरावर घेऊन गेले. मला मारहाण करताना ते बोलत होते की, याला सोडायचं नाही. याला मारूनच टाकायचं. याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा. ते मला मारून टाकत होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी शिवराजने केली.

काही लोक मदतीला धावून आल्यानेच मी जिवंत राहू शकलो, अन्यथा त्यांनी मला जीवंत सोडलं नसतं. त्यांनी मला कत्ती, लोखंडाचे रॉड, बांबूने मारहाण केली. दारूच्या बॉटल्या माझ्या डोक्यात घातल्या. पण ती फुटली नाही. ते सर्व गांजा प्यायलेले होते, असंही शिवराजने सांगितलं.

आरोपींवर मोक्का लावा – राजेसाहेब देशमुख
दरम्यान, शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांनी शिवराजची भेट घेत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून ठोस पावले उचलण्याची मागणी केली. चे म्हणाले, शिवराज दिवटेला आरोपींनी अमानुष मारहाण केली. मारहाण करत असताना काही माणसं तिथं आली. त्यामुळे तो वाचला. पोलिसांनी ज्या लोकांना ताब्यात घेतलं, त्यांची धींड काडून त्यांच्यावर मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सात आरोपींना अटक, दोघे अल्पवयीन
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचा जबाब घेतला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही सात आरोपींना अटक केली. त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत, हे प्रकरण तात्कालीन असून यामागे जातीय कारण नाही. अटक केलेल्या आरोपींमध्ये वेगवेगळ्या समुदायातील मुलांचा समावेश असून या प्रकरणाचा सखोल तपास होईल, असं आश्वासन कॉवत यांनी दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube