धनंजय मुंडे अन् वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MOCCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

धनंजय मुंडे अन् वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MOCCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

Beed Crime : बीड पोलिसांनी जिल्ह्यातील गुंडांविरोधात कारवाईची मोहिम सुरू केली आहे. (Crime) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्याशी संबंधित आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

तळोडी येथील एका शेतकऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. गुंड गोट्या गित्ते याच्यासह सात जणांविरोधात बीड पोलिसांनी कारवाई केली. याबाबत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडसोबत आरोपींचे फोटो शेअर केले आहेत.

राज्यात नव्या युतीची नांदी; चहा पिला अन् खिचडी खाता-खाता सामंतांची राज ठाकरेंना युतीची ऑफर

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी हल्ला झाला होता. शेतकऱ्याला लोखंडी रॉड आणि फरशीने जखमी केले. या शेतकऱ्याजवळील २ लाख ७० हजार रुपयेही जबरदस्तीने घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या मारहाण प्रकरणी रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गित्ते या पाच आरोपींना अटक केली होती. धनराज फड आमि गोट्या गित्ते फरार आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात बीडचे अधिक्षक नवनीत कॉवत यांनी आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली. या सर्व आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मकोका अंतर्गत कारवाई

रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनावणे, बाळाजी दहिफळे, विलास गित्ते, धनराज उर्फ राजेभाऊ फड, ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते या आरोपींविरोधात कारवाई केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube