Download App

Box Collection: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ७ दिवसात कमावले इतके कोटी…

Box Office Collection: सिनेमा गृहामध्ये सध्या ‘गदर 2’ आणि ‘OMG2’ हे दोन सिनेमांनी जोरदार धुमाकूळ घातला आहे. दोन्ही सिनेमांनी तगडी कमाई करत सर्वांच लक्ष वेधलं आहे. असं असताना आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) किती चालेल याचा अंदाज लावता येत नव्हता. परंतु गदरच्या लाटेत आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल 2’ची नवा टप्पा पार केला आहे, असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या आठवड्यामध्ये ‘ड्रीम गर्ल 2’ ने तगडी कमाई केल्याचे बघायला मिळत आहे. सर्वत्र सध्या या सिनेमाचं कौतुक होतं आहे.

पूजा म्हणजेच अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याच्या अभिनयाने परत एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आयुष्मानने त्याच्या अभिनयाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. 25 ऑगस्ट दिवशी ‘ड्रीम गर्ल 2’ प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शितच्या केवळ ६ दिवसात सिनेमानं जोरदार यश मिळवलं आहे. एकीकडे ‘गदर 2’ आणि ‘OMG2’ बघण्यासाठी गर्दी होत असताना ‘ड्रीम गर्ल 2’ने देखील चाहत्यांना सिनेमा गृहाकडे वळण्यास भाग पाडलं आहे.


‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या आठवड्याच्या विकेंडला प्रत्येक दिवशी वाढती कमाई केली आहे. केवळ मोठ्या शहारांमध्ये नाही तर उपनगरांमध्ये देखील सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ ने पहिल्या दिवशी १०.६९ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी १४.०२ कोटी, तिसऱ्या दिवशी १६ कोटींचा गल्ला कमावला आहे. त्यानंतर चौथ्या दिवशी सिनेमाची कमाई ४.४२ कोटी, पाचव्या दिवशी ५.८७ कोटी, सहाव्या आणि सातव्या दिवशी सिनेमानं प्रत्येकी ७.५० कोटींची कमाई केली आहे.

Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

‘ड्रीम गर्ल 2’ ने पहिल्या आठवड्यात एकूण ६७ कोटींचा गल्ला कमावला आहे. सिनेमाची पहिला आठवड्याची कमाई बघून सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. सिनेमात अभिनेता आयुष्यमान खुरानाने साकारलेल्या मुलीच्या भुमिकेचं चाहते मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. आयुष्मानसोबत सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडे प्रमुख भुमिकेत आहे. त्याचप्रमाणे अभिनेते परेश रावल, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर, सीमा पहवा आणि विजय राज हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Tags

follow us