Ayushmann Khurrana : युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय दूत म्हणून आयुष्मान खुरानाने प्रतिष्ठित फुटबॉलर व युनिसेफ गुडविल अॅम्बेसेडर डेव्हिड बेकहॅम यांचे भारतात आगमन झाल्यावर मनापासून स्वागत केले. आपल्या-आपल्या क्षेत्रातील हे दोन जागतिक दर्जाचे कलाकार सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यांची बांधिलकी सीमांच्या पलीकडे आहे आणि ती सहानुभूती, जबाबदारी आणि प्रत्येक मुलाला शिकता यावे, स्वप्न पाहता यावे आणि प्रगती करता यावी या ध्येयावर आधारित आहे.
विशाखापट्टणममधील एका शाळेला भेट देण्यासाठी भारतात आलेल्या बेकहॅमबद्दल बोलताना आयुष्मान (Ayushmann Khurrana) म्हणाला, “डेव्हिड बेकहॅम (David Beckham) हे असे आयकॉन आहेत जे जगभरातील समाजावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात. सामाजिक कार्याबद्दल त्यांची निष्ठा आणि भारतावरील त्यांचे प्रेम खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या भारत भेटीने लोकांना चांगले काम करण्यास प्रवृत्त करतात आणि आपल्या गरजांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधतात. ते भारताचे खरे मित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. युनिसेफच्या सहकारी दूत म्हणून त्याच मुद्द्यांसाठी एकत्र काम करणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.”
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 35 जागांवरील निवडणूक रद्द; नेमकं कारण काय?
डेव्हिड बेकहॅम आणि आयुष्मान खुराना या दोघांचा विश्वास आहे की दुर्बल मुलांसाठी उभे राहणे, त्यांचे ऐकणे आणि त्यांना साथ देणे यातूनच उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते आणि आज, युनिसेफ अॅम्बेसेडर्स म्हणून ते हे कार्य एकत्रितपणे करत आहेत.
गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
