‘Aapaki प्यारी Pooja…’, आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नव्या लूकची होतेय चर्चा

Ayushmann Khurrana Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) सिनेमांच्या यादीमध्ये ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) हा सिनेमाचा अतिशय महत्वाचा ठरला होता. त्याचा हा सिनेमा चाहत्यांना मोठ्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अखेर आता ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T155614.752

Ayushmann Khurrana Dream Girl 2 Release Date

Ayushmann Khurrana Dream Girl 2 Release Date : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) सिनेमांच्या यादीमध्ये ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) हा सिनेमाचा अतिशय महत्वाचा ठरला होता. त्याचा हा सिनेमा चाहत्यांना मोठ्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अखेर आता ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.


‘ड्रीम गर्ल 2’ची रिलीज तारीख

‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) हा सिनेमा अगोदर ७ जुलैला चाहत्यांच्या भेटीला येणार होता. पण आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा २५ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

आयुष्मानने या चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ‘ड्रीम गर्ल 2’च्या रिलीज डेटबद्दल मोठी माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘माझे प्रियजन… आता ४वर्षांनी मी तुमच्या भेटीला येत आहे. तर माझी एन्ट्री दिमाखदार असायला हवी ना? थोडी प्रतीक्षा करा..आणि तुमचं माझ्यावरचं प्रेम असच राहू द्या.

आयुष्मान खुरानाच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे, आम्ही 7 जुलैची वाट बघत होतो आणि तुम्ही रिलीज डेट पुढे ढकलली, काय झालं आयुष्मान भावा? रिलीज डेट पुढे का ढकलली आहेस? आम्हाला तुझी आठवण येत आहे. आमचं मनोरंजन तूच करू शकतो, अशा कमेंट्स अनेक चाहत्यांनी केले आहेत, अशा कमेंट्स चाहत्यांनी करायला सुरवात केली आहे.

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट विनोदी असल्याने चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राज शांडील्य दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलीफिल्म्सच्या बॅनरअंतर्गत होत आहे.

‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाबद्दल एकता कपूर (Ekta Kapoor) म्हणाल्या,ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात पूजाची भूमिका आयुष्मानने चोख पार पाडावा अशी आमची इच्छा आहे. या चित्रपटाच्या वीएफक्ससह इतर गोष्टींवर आम्ही खूप मेहनत घेत आहोत.

Exit mobile version