सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

सचिन तेंडुलकरचे 5 विक्रम एका क्लिकवर, रेकॉर्ड्स मोडणं मुश्कील, आजूबाजूला एकही फलंदाज नाही

Five records of Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. मास्टर ब्लास्टर, लिटल मास्टर आणि इतर अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिनने आपल्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या खेळाने एक नाही, दोन नाही तर अनेकांना पिढ्यांना फॅन करून ठेवलं आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर राज्य करणारा सचिन क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ उलटला आहे. पण आजही सचिनच्या खेळाचा करिष्मा जराही कमी झालेला नाही. क्रिकेटमध्ये सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 22 यार्डच्या खेळपट्टीवर एकतर्फी राज्य केले. 22 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, अनेक विक्रम केले आहेत, जे तोडणं कदापि शक्य नाही.

1. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत, हा देखील एक विश्वविक्रम आहे. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये 200 सामने खेळणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 329 डावांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या. त्याच वेळी, वनडेमध्ये लिटिल मास्टरच्या बॅटमधून 18,426 धावा निघाल्या. कसोटी आणि वनडेमध्ये सचिनच्या या विक्रमाच्या आसपासही एकही फलंदाज दिसत नाही. त्याच बरोबर मास्टर ब्लास्टरने फक्त एक टी – 20 सामना खेळला, ज्यामध्ये त्यांने 10 धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज होता.

2. सर्वाधिक शतके
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके झळकावणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे. सचिनचा हा विक्रम मोडणे जगातील कोणत्याही फलंदाज दिसत नाही. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली आहेत. तर 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही सचिनने केला आहे.

3. सर्वाधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याचा विक्रम
22 वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा सचिन हा फलंदाज आहे. T20 ची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, सचिनच्या या विक्रमाची बरोबरी जागतिक क्रिकेटमधील क्वचितच कोणी करू शकेल.

एमपीएससी म्हणजे Maharashtra Public Shocking Commission; डेटा लीक प्रकरणात अमित ठाकरेंची उडी

4. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी सामने खेळले आणि या कालावधीत 51 शतके आणि 68 अर्धशतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टरने पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना 2,127 वेळा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नेला आहे, ज्यामध्ये 2058 चौकार आणि 69 आकाशी षटकारांचा समावेश आहे.

5. सर्वाधिक विश्वचषक सामने खेळण्याचा विक्रम
सर्वाधिक विश्वचषक खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण सहा विश्वचषक खेळले आणि गेल्या विश्वचषकातही तो टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात यशस्वी ठरला होता. सचिनने 1992 मध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. यानंतर, तो 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 विश्वचषक संघाचा भाग होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube