एमपीएससी म्हणजे Maharashtra Public Shocking Commission; डेटा लीक प्रकरणात अमित ठाकरेंची उडी
Admit cards of almost 1 lakh students of MPSC pre-examination viral on social media : MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card of Joint Preliminary Examination) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. टेलिग्राम या अॅपवर लाखो विद्यार्थ्यांची माहीती तसेच प्रवेशपत्र असा डेटा लिक झाला आहे. यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर विरोधकही या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात मनसे नेते अमित ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत आपली भूमिका मांडली आहे.
अमित ठाकरे यांनी फेसबुकरवर लिहिलं की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परिक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय जाली. पण आजचं MPSC Deta Leak प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेसपत्रं, आयोगागडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसंच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसंच आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली.
Sachin Tendulkar : अंजली मेहता कशा झाल्या मास्टर ब्लास्टरच्या होम मिनिस्टर, जाणून घ्या लव्हस्टोरी…
ते म्हणाले. डेटा खूप मौल्यवान आहे, हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्टसच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांवर वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2 दिवसांपूर्वीच हॉलतिकीट वितरित करण्यात आले. ते डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो. तो भरल्यानंतरच आयोगाचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येते. असं असूनही काल अगदी सहजरित्या टेलिग्रामवर विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि सोबत गोपनीय माहिती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, हा केवळ नमुना आह. आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचे पोर्टल लॉग इन आयडी, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार, ईमेल अशी माहीत उपलब्ध आहे. शिवाय, संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आमच्याकडे उपलब्ध आहे, असा दावा या लिंकद्वारे करण्यात आला.
दरम्यान, हा डेटा लिंक करणाऱ्यांविरूध्द एमपीएससी नेमकी काय कारवाई करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.