Sachin Tendulkar : अंजली मेहता कशा झाल्या मास्टर ब्लास्टरच्या होम मिनिस्टर, जाणून घ्या लव्हस्टोरी…
Sachin Tendulkar Birthday : भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे क्रीडा रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर क्रिकेट म्हणजे पंढरी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव असंच मानलं जातं. सचिनचे चाहते म्हणजे त्याच्यावर आणि त्याच्या खेळावर अगदी ओवाळून टाकतात. त्याच्या अनेक फॅन्सच्या अनेक रंजक स्टोरीज नेहमीच पाहायला मिळाल्या आहेत. तशीच सचिनची कारकीर्द देखील भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा काळ आहे.
आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. सचिनच्या पन्नास वर्षांच्या जीवनाचा आलेख बघायचा झाला तर 15 नोव्हेंबर 1989 मध्ये कराचीमध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्ध च्या टेस्ट क्रिकेटमधून त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सचिनच्या नावावर क्रिकेटच्या विश्वातील अनेक रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. त्यात भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरलेला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक म्हणजे शंभर शतकं करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे.
त्याच्या या यशाला दिवसेंदिवस झळाली मिळत गेली ती अर्जुन अवॉर्ड, खेळरत्न, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. तर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार देखील सचिनला देण्यात आला आहे. सचिनच्या या दैदिप्यमान आणि अभिमानाने उर भरून आणणाऱ्या कारकिर्दीमध्ये त्याचे कोच आचरेकर गुरुजी, त्याचं कुटूंब, त्याची पत्नी यांची भुमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे.
मास्टर ब्लास्टरच्या होम मिनिस्टर म्हणजे डॉ. अंजली मेहता पण सचिन आणि अंजलीची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? याची फारशी माहिती आपल्यापैकी अनेकांना नसते. त्यामुळे सचिन आणि अंजलीची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? जाणून घेऊ सविस्तर इंग्लंड दौऱ्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने सचिनवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत होता. यावेळी हा दौरा आटोपून सचिन भारतात परत येत होता. चाहते विमानतळावर सचिनला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करून होते. याच गर्दीच क्रिकेटशी काडीमात्र संबंध नसलेली आणि सचिनला भेटायला नाही तर आपल्या आईला घ्यायला आलेली अंजली होती.
ही गर्दी कशासाठी जमली आहे. हे देखील अंजलीला माहित नव्हतं. जेव्हा मैत्रिणीने अंजलीला सांगितले की, ‘हाचं तो क्रिकेटर त्याला भेटण्यासाठी इतके सारे त्याची चाहते आणि पत्रकार येथे आले आहेत.’ तेव्हा अंजलीला सचिनला भेटण्याची आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली. तिने थेट त्या गर्दीत सचिन ला जोरात हाका मारल्या. एका तरूणीने अशा हाका मारल्याने सचिनही गोंधळून गेला. पण ओझरतं पाहिल्याने अंजलीचा चेहरा नाही मात्र सचिनने तिच्या शर्टचा रंग पक्का लक्षात ठेवला.
त्यानंतर अंजलीने काही मित्रांकडून सचिनचा नंबर मिळवला. त्याच्या घरी फोन लावला. सुदैवाने अंजलीचा फोन सचिनने उचलला दोघांचं बोलण झालं. यावोळी अंजलीने ओळख पटवण्यासाठी आपण विमानतळावर भेटलो असल्याचं सांगितलं. आपण कोणत्या रंगाचा टी-शर्ट घातला होता असं विचारलं अन् सचिननेही अगदी बरोबर उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराने अंजलीचा आनंद गगणात मावेनासा झाला.
अहमदनगरला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, फडणवीसांची घोषणा
त्यानंतर तिने आपण एक फत्रकार आहोत आणि आपल्याला सचिनची मुलखत घ्यायची असल्याचं सांगत ती थेट सचिनची मुलाखत घेण्यासाठी सचिनच्या घरी पोहोचली त्यावेळी सचिनच्या आईला मात्र या दोघांमध्ये असलेलं प्रेम दिसून आलं. यानंतर दोघांनी एकमेकांना पाच वर्ष डेट केले आणि 1995 मध्ये ते विवाहबद्ध झाले. अंजली यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
सचिन देखील अनेकदा आपली पत्नी अंजलीच्या समजूतदारपणाबद्दल आणि कुटूंबाची जबाबदारी त्या एकट्या कशा सांभाळतात याबद्दल सांगत असतो. तर सचिन बद्दल बोलताना अंजली सांगते की, ‘सचिन हा शांत स्वभावाचा आणि प्रेमळ नवरा आहे. क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या कामगिरीचं मला नेहमीच कौतुक वाटते. सचिन जेव्हा खेळत असतो तेव्हा हातातील सर्व काम बाजूला ठेवून मी त्याचा खेळ अगदी मन लावून पाहते’.