Sachin Tendulkar 50th birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 10 सर्वोत्तम खेळी, ज्या चाहते कधीही विसरणार नाहीत

Sachin Tendulkar 50th birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 10 सर्वोत्तम खेळी, ज्या चाहते कधीही विसरणार नाहीत

Sachin Tendulkar celebrates 50th birthday today : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) आज 50 वा वाढदिवस आहे. ‘क्रिकेटचा देव’ असा दर्जा मिळालेल्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. क्रिकेटच्या खेळपट्टीवर राज्य करणारा सचिन क्रिकेटमधून निवृत्त होऊन बराच काळ उलटला आहे. पण आजही सचिनच्या खेळाचा करिष्मा जराही कमी झालेला नाही. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. यातले अनेक विक्रम आजही, सचिनच्या नावावर आहेत. जे भारतीय चाहते कधीही विसरू शकत नाहीत.

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International cricket) 30000 हून अधिक धावा केल्या आहेत. इतक्या धावा करणारा सचिन हा जगातील एकमेव खेळाडू आहे.

1. 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौऱ्यावर शतक
वयाच्या 19 व्या वर्षी सचिनने जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी समजल्या जाणाऱ्या पर्थच्या मैदानावर क्रेग मॅकडरमॅड आणि मर्व्ह ह्युजेससारख्या वेगवान गोलंदाजांसमोर निर्भय खेळी खेळली होती. हा त्याचा पहिला ऑस्ट्रेलियन दौरा होता, पण तो घाबरला नाही आणि त्याने आपले शानदार शतक झळकावले. सचिनने 161 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 114 धावांची शानदार खेळी सचिनने केली.

2. 1998 मध्ये शारजाहमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई
भारतीय संघाचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर 1998 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 22 एप्रिल 1998 रोजी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्याने आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना थक्क केले. सचिनने एकीकडे भारतीय विकेट्स पडताना अवघ्या 131 चेंडूत 143 धावांची दमदार खेळी करत भारताला तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत नेले होते.

3. पाठदुखी असूनही 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले
आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सचिन तेंडुलकर प्रत्येक अडचणीचा सामना करण्यास तयार होता. 1999 मध्ये चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध 136 धावा केल्या होत्या. यावेळी दरम्यान, सचिनला पाठदुखीचा त्रास होता. असं असतानाही त्याने फलंदाजीसाठी उतरून पाकिस्तानची अवस्था बिघडवली होती.

4. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार खेळी
1997 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 529 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ 58 धावांत 5 विकेट गमावून अडचणीत सापडला होता. यानंतर सचिनने दक्षिण आफ्रिकेची जबरदस्त धुलाई केली. सचिनने मोहम्मद अझरुद्दीनचीसोबत 222 धावांची भागीदारी केली. यामध्ये सचिनने 169 धावा केल्या.

Weather Update : पुढील पाच दिवस राज्याला पुन्हा अवकाळी झोडपणार, हवामान विभागाचा अंदाज

5. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 241 धावांची खेळी
सचिन तेंडुलकरने 2004 मध्ये सिडनी कसोटीत 241 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती. सचिनने सामन्यात 33 पैकी 28 चौकार मारले आणि केवळ लेग साइडवर 188 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने सचिनच्या या शिस्तबद्ध खेळीचे कौतुक केले.

6. 2003 च्या विश्वचषकात शोएब अख्तरचा पराभव झाला होता
सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 98 धावांची खेळी केली होती. त्याचे शतक हुकले पण त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, वसीम अक्रम, वकार युनूस या स्टार जोडीचा पराभव केला. सचिनच्या या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून सहज पराभव केला.

7. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या निर्णायक सामन्यात 155 धावांची खेळी
1997-1998 मधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा हा सामना निर्णायक ठरला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने चेन्नईत नाबाद 155 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीने संघाला विजय मिळवून दिला. यासाठी सचिनची ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणूनही निवड करण्यात आली.

8. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये 200 धावा
सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आहे. यामध्ये वनडे क्रिकेटमधील पहिल्या द्विशतकाच्या विक्रमाचाही समावेश आहे. सचिनच्या या खेळीपूर्वी, क्वचितच कोणी विचार केला असेल की एक फलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक देखील करू शकतो. पण सचिनने हा करिष्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला आणि अवघ्या 147 चेंडूत 200 धावांची शानदार खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं.

9. संघ सामना हरला, तरीही ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार
2004 मध्ये सचिनने रावळपिंडीत 135 चेंडूत 141 धावांची खेळी केली होती. यात सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता. पाकिस्तानने 12 धावांनी हा सामना जिंकला होता. मात्र असे असतानाही सचिन तेंडुलकरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube