Download App

शिर्के खरचं गद्दार होते? इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे काय म्हणाले होते?

Babasaheb Purandare छावा चित्रपटामध्ये शिर्के गद्दार दाखवण्यात आले. त्यावर इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी काय सांगितले होते. जाणून घेऊया...

  • Written By: Last Updated:

Babasaheb Purandare on shirke treachery during Chhaava contervercy : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्र गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यावर त्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला त्यावरून वातावारण तापलं असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी माफी देखील मागितली मात्र इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी काय सांगितले होते. जाणून घेऊया…

पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी…” गीताला जाहीर

छावा चित्रपटानंतर सुरू झालेल्या वादाच्या दरम्यान एक व्हिडिओ सध्या बाहेर होते ज्यामध्ये इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की, शिर्केंसारखं एक अत्यंत कर्तृत्ववान घराणं पण त्यांच्यावर एवढा अन्याय कुणामुळे झाला आणि तू कशामुळे टिकला. कारण सगळे छत्रपती शिरक्यांवर अत्यंत विश्वास ठेवायचे तसेच शिर्केंची स्वराज्यावर निष्ठा नसते तर ते राजे कसे झाले असते.

मंत्री बेफिकीर आणि अधिकारी सैराट, प्रशासन जनतेची कामेच करत नसल्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुढे पुरंदरे म्हणतात की, शिर्के हेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांचे नातेवाईक देखील होते. त्यानंतर देखील कित्येक नाते हे भोसले आणि शिर्के यांचे पाहायला मिळतात. त्यामुळे जर शिर्केंनी दगाबाजी केली असती तर त्यांच्याशी नाते संबंध जोडले गेले नसते. शिर्केंबाबत चुकीचं लिहिलं गेलं चुकीचं रंगवलं गेलं. तसेच नाटक आणि सिनेमांमध्ये एखादी गोष्ट आली की ती कानाकोपऱ्यात पोहोचते त्यामुळे गैरसमज सहज पोहोचतो त्यामुळे नाटक सिनेमांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे शिर्के घराण्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या शिर्के घराण्याच्या स्वराज्याबद्दलच्या निष्ठेवर उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

छावा (Chhaava) या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्र गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र गणोजी शिर्के यांचे वंशज संतापल्याचं पाहायला (Chhaava Movie) मिळतंय. त्यांनी छावाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

यासंदर्भात पत्रकार परिषद घेत गणोजी शिर्के यांच्या नातेवाईकांनी छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. छावा चित्रपट प्रदर्शित करताना गणोजी शिर्के यांच्या घराण्याची बदनामी केलीय. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिर्के घराण्याचे मुख्य वंशज, किल्ले धर्मवीरगड बहादुरगड संस्थानिक दीपक राजे शिर्के म्हणाले की, द्वेषापोटी, जाणीवपूर्वक हा षडयंत्र करून इतिहास बदलून मांडण्यात आलाय. असं ते म्हणाले होते.

follow us