‘छावा’ चित्रपटाचा वाद…सकारात्मक निर्णय घेऊ, उदयनराजे भोसलेंचे शिर्के घराण्याला आश्वासन

Shirke Family Meet Chhatrapati Udayanraje Bhosale : मागील काही दिवसांपूर्वी छावा (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर शिर्के घराण्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप केलेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची (Udayanraje Bhosale) शिर्के घराण्यासोबत सकारात्मक चर्चा (Shirke Family) झाल्याचं समोर आलंय.
आज वादग्रस्त छावा हिंदी चित्रपटासंदर्भात चर्चा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजघराण्याचे थेट 13 वे वंशज छत्रपती श्रीमंत उदयनराजे (महाराज ) भोसले यांची शंभुपत्नी महाराणी येसुबाई तथा स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याच्या किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड ) येथील वंशजांसह अन्य शिर्के परिवारातील सदस्यांनी भेट घेऊन सविस्तर सकारात्मक चर्चा करत निवेदन पत्र दिले.
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर! अर्थमंत्री अजित पवारांनी अहवाल मांडला; वाचा, काय आहे सत्य?
बैठकी दरम्यान शिर्के यांनी महाराज साहेब यांना वादग्रस्त छावा चित्रपटाच्या माध्यमातून जो खोटा इतिहास दाखवून छत्रपतींच्या जवळील नातेवाईक शिर्के घराण्यातील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के आणि श्रीमंत कान्होजीराजे शिर्के यांना बदनाम केले आहे. अजूनही करत आहेत. छावा चित्रपट चांगला असला, तरी यात मुद्दामपणे समस्त राजेशिर्के परिवार बदनामीच्या फेऱ्यात अडकवला आहे.
मोघलांना खलनायक दाखवायचे सोडून मराठा घराणेच दोषी दाखविले आहे. यामुळे जगाला चुकीचा संदेश गेला आहे. अशा बेजबाबदार चित्रपट टिमवर कडक कारवाई व्हावी चुकीला माफी देऊ नका, अशी राजेशिर्के यांनी जोरदार मागणी करत तात्काळ निर्णय घ्यावा, असे सर्वांनी सांगितले. यावर उदयनराजे भोसले यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
गरिबाला अमानुष मारहाण, नोटांची उधळपट्टी अन् धसांबरोबर फोटो; बीडचा सतीश भोसले नेमका कोण?
जोपर्यंत खरे दोषी जगासमोर समोर येत नाही, तोपर्यंत शिर्के घराण्याचा लढा कायदेशीर पद्धतीने पुढे चालू राहणार असल्याचं समोर येत आहे. यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की,
आज पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय घेतला, कारण या संपूर्ण जगात एकमेव व्यक्तिमत्व होतं. त्या काळात ज्यावेळे संपूर्ण साम्राज्य वाढवण्याचं काम करत होते, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील एक-एक क्षण हा लोकांवरील अन्याय दूर करण्यात घालवला. स्वराज्य निर्माण केलंय.