Download App

Bahirji Movie Teaser: ‘हिंदवी स्वराज्याचा पहिला गुप्तहेर; ‘बहिर्जी’ चा धमाकेदार टिझर रिलीज

Bahirji Movie Teaser: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर आधारित काही चित्रपट नुकतेच येऊन गेले. आगामी काळात असे आणखीही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छत्रपतींचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांच्यावर आधारित एक चित्रपट तयार होत आहे. (Marathi Movie) ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं टिझर नुकतंच प्रदर्शित झालं असून, दिग्दर्शक राहुल जाधव यांनी याबद्दल माहिती दिली आहे.


मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर महाराज शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज आणि मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराराणींना वंदन करून रुपेरी पडद्यावर साकार करत आहोत. आता या सिनेमात नेमके कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार, चित्रपट कोण दिग्दर्शित करणार याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.

स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवरायांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या नीडर मावळ्यांची. शत्रूच्या गोटात शिरुन तिथली खडा न् खडा खबर आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बहिर्जींनी खुबीनं पार पाडली होती. पराक्रमी आणि महाराजांच्या खास मर्जीतील असलेल्या बहिर्जी यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता असणार आहे. लेखक किरण माने यांनी या चित्रपटासाठी लेखनाची धुरा सांभाळली आहे.

Video : बोला जय श्रीराम ! ‘खास रे’चे खास उत्सवगीत बघाच…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिसरा डोळा म्हणून गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक होत. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक होते. युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. अर्थातच त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते. सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्त्व बहिर्जी नाईक यांनी केले आहे. बहिर्जी नाईक यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. गुप्तहेर खात्याची एक अनोखी म्हणजेच वेगळी भाषा बहिर्जी नाईक यांनी विकसित केली होती.

follow us