Video : बोला जय श्रीराम ! ‘खास रे’चे खास उत्सवगीत बघाच…

  • Written By: Published:
Bola Jai Shriram   Thumbnail   Khaas Re TV

पुणे : साऱ्या विश्वाला ज्या गोष्टीची आतुरता आहे ते म्हणजे अयोध्या (Ayodhya) येथे होत असलेल्या प्रभुरामाच्या मंदिराचे. येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. याच एेतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भजनी ठेक्याचा बाज असणारे एक रोमांचक उत्सवगीत आता खास रे टीव्ही (Khaas Re TV) घेऊन आले आहे. माझा प्राण, प्रभुराम !! मुखी नाम, बोला जय श्रीराम !! चला सामील होऊया रामभक्तीच्या ह्या उत्सवात ! असे गीताचे बोल आहेत.

राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं? विश्वस्त चंपत राय यांनी तारीखच सांगितली

सोहम ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी या गीताची निर्मिती केली आहे. तर संकल्पना, लेखन, दिग्दर्शन संजय श्रीधर कांबळे यांचे असून, त्यांनी यात अभिनय ही केला आहे. गायक निरंजन पेडगांवकर हे आहेत. तर संगीत संदेश कालेकर यांचे आहेत. विराज लटके, ईशानी हंगे, विहान शेडगे, हर्षराज पेडगांवकर, ओंकार नवटे, मंदार मोकाशी हे कलाकार या गितामध्ये आहेत. प्रविण कांबळे, वैभव चव्हाण, महेश महामुनी यांचे कला दिग्दर्शन आहे.
कृष्णा जन्नू आणि संजय कांबळे यांचे एडिटिंग आहे.


बोपगावमध्ये शुटिंग

या खास गाण्याचे शुटिंग बोपगाव येथे झाले आहे. येथील पदाधिकारी, ग्रामस्थांची मोलाची मदत झाली आहे. ज्ञानेश्वर, कानिफनाथ भजनीमंडळ, कानिफनाथ ढोल लेझीम मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

हटके गाण्यांसाठी प्रसिध्द

खास रे टीव्ही युट्यूब चॅनेलद्वारे नेहमीच आपल्या हटके गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ऊसाचा रस, गावरान मुंडे, चहा प्या, लस घ्या, चुलीवर, काम द्या, बाप पांडुरंग ही गाणी करोडो मराठी जनतेनी पाहिली आहेत.
थोडक्यात सांगायचं तर सगळी गाणी व्हायरल आहेत.

follow us