रणबीर कपूर झाला पुणेकर! अयोध्येनंतर पुण्याच्या ‘या’ भागात तब्बल 16.42 कोटींच्या 25 एकर जमीन खरेदी

Ranbir Kapoor purchased land in Pune रणबीरने पुण्यामध्ये 25 एकर जमीन खरेदी केली आहे. मुळशी तालुक्यामध्ये ही जमीन खरेदी करण्यात आली आहे.

Ranbir Kapoor Purchased Land In Pune

Ranbir Kapoor becomes Pune resident purchased 25 acres land in Pune worth 16.42 crore after Ayodhya : अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी तेथे जमीन खरेदी केल्याच्या बातम्या आल्या. यामध्येच एक नाव होतं ते बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचं. त्यानंतर आता रणबीरने पुण्यामध्ये देखील 16.42 कोटी किंमतीची तब्बल 25 एकर जमीन खरेदी केली आहे. मुळशी तालुक्यामध्ये ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अभिनेता रणबीर कपूर हा देखील पुणेकर झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

ट्रम्प यांच्याकडून होर्मुज पुन्हा बंद! जहाजांवर लावणार 20 टक्के टॅक्स; इराणसोडून ‘या’ देशांना सूट

या जमीन खरेदीची नोंदणी 30 एप्रिल 2026 रोजी झाली. यामध्ये पिंपरी गावाच्या लगत असलेल्या चार भूखंडाचा समावेश आहे. यातील 43,800 चौरस मीटरचा सर्वात मोठा भूखंड 7.7 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला. तसेच 29, 900 चौरस मीटरचा भूखंड 4.62 कोटी रुपयांना, 21, 400 चौरस मीटरचा भूखंड 3.31 कोटी रुपयांना आणि 8,900 चौरस मीटरचा चौथा भूखंड हा 1.39 कोटी रुपयांना घेण्यात आल्याची माहिती सीआरआय मॅट्रिक्सद्वारे मिळवलेल्या कागदपत्रांमध्ये देण्यात आली आहे.

Amarnath Yatra 2026: अमरनाथमधील शिवलिंग पाच दिवसांत वितळले; नेमकं कारण काय ?

एकूण चार भूखंडांचे क्षेत्रफळ 1,04,000 चौरस मीटर, म्हणजेच सुमारे 25.7 एकर इतके आहे. या व्यवहाराची एकूण किंमत 16.42 कोटी रुपये असून, मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार या खरेदीसाठी 82.13 लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरावा लागला आहे. रणबीर कपूरची ही एकमेव जमीन खरेदी नाही. यापूर्वी मे 2026 मध्ये ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या कंपनीने रणबीर कपूरने त्यांच्या ‘द सरयू’ या प्रकल्पात सुमारे 3.31 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केल्याची माहिती दिली होती.

तुकाराम मुंढेंची आता ब्लड बँकांवर करडी नजर; 21 ब्लड बँकांचे परवाने निलंबित, जिल्हा रुग्णालयाला सोडले नाही

2,134 चौरस फूट क्षेत्रफळाचा हा भूखंड सरयू नदीच्या काठावरील 75 एकरांच्या प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रकल्पाचा भाग आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रकल्पात आधुनिक क्लब हाऊस, 35 हून अधिक लाइफस्टाइल सुविधा तसेच द लीला समूहाकडून संचलित करण्यात येणारे पाच एकरांवर उभारलेले पूर्णपणे शाकाहारी लक्झरी हॉटेल विकसित केले जाणार आहे.

राज्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; भेसळयुक्त दूध, खाद्यतेल, न्यूट्रास्युटिकल्स, गुटखा आणि हॉटेलांवर छापे, ६.३३ कोटींचा साठा जप्त

रणबीर कपूरची ही ताजी गुंतवणूक बॉलिवूड कलाकारांमध्ये वाढत असलेल्या एका नव्या प्रवृत्तीचे प्रतीक मानली जात आहे. गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी केवळ मुंबईपुरतीच मर्यादित न राहता अलिबाग, लोणावळा, पुणे आणि गोवा यांसारख्या ठिकाणी शेतीची जमीन, बिगरशेती भूखंड, हॉलिडे होम्स आणि प्रीमियम निवासी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. रणबीर कपूरव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, कार्तिक आर्यन, कृती सॅनॉन, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक नामवंतांनीही देशभरातील विविध प्रीमियम रिअल इस्टेट प्रकल्प आणि भूखंडांमध्ये गुंतवणूक केली आहे.

follow us