मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी, पळून जाणार नाही; राजीनाम्याच्या चर्चांनंतर स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचं स्पष्टीकरण

Ram Mandir Donation Swami Govinddev Giri Maharaj हे राजीनाम्याच्या चर्चा होत्या त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

Ram Mandir Donation Swami Govinddev Giri Maharaj

Ram Mandir Donation Swami Govinddev Giri Maharaj clarifies following speculation about resignation : अयोध्येतील श्रीराम मंदिरात भाविकांनी ( Ram Mandir Donation) अर्पण केलेल्या देणग्याच्या कथित चोरी झाल्याच्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Govinddev Giri) हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी आज 14 जुलै 2026 रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली.

नेमकं काय म्हणाले स्वामी गोविंददेव गिरी महाराज?

मी राजी नामा देणार असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी असं कुठेही म्हटलेलं नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे, मैदान सोडून पळून जाणार नाही तर सर्व समस्यांचं निराकरण करणार आहे. तसेच मी पुण्यात राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये आमच्या संस्थेचे 5 फ्लॅट आहेत. त्यातील एकही माझ्या नावावर नाही. माझ्या जीवनात माझ्या नावावर फक्त एक बँक अकाऊंट आहे. मात्र इतर एकही संपती नाही. एक वीटही नाही.

अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का? दूध भेसळीवरील कारवायांवरून सुजय विखेंचा सवाल

माझ्या राजीनाम्याची खोटी बातमी पसरल्यानंतर अनेक लोकांचे फोन मेसेज आले. त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

follow us