Download App

Baipan Bhari Deva’ने तोडला बॉक्स ऑफिसचा रेकॉर्ड! कमाईचा आकडा पाहून केदार शिंदे म्हणाले…

Box Office Collection: कोविडनंतर बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे हे चटकन खाली आपटले आहेत. मराठी सिनेमातही थोड्या फार प्रमाणामध्ये तसेच चित्र आहे. परंतु केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. ३० जूनला रिलीज झालेला हा मराठी सिनेमा यंदाच्या वर्षामध्ये विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा (Marathi Movie) ठरला आहे.


या सिनेमाचे विकेंडचं नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ६.४५ झाले आहे. यावर केदार शिंदेंनी देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली, दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली ‘सही रे सही’ आलं. त्याला तुम्ही मायबाप चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

गेल्या अनेकवर्ष त्याचे “हाऊसफुल्ल” चे बोर्ड मी बघत आलो आहे.’ असं ट्वीट त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान ‘बाईपण भारी देवा’हा सिनेमा ६ बहिणींसोबत फिरत आहे. मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने बहिणी-बहिणींमध्ये झालेला समज-गैरसमजांचा गुंता कसा सुटतं याची ही मेजवानी दाखवणारा सुपरहिट सिनेमा ठरला आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा पहिला शो पासून प्रेक्षक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. या सिनेमाने सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगात आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात चांगलीच मोठी कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे चाहते या सिनेमाला भरभरून कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच अनेकजण इतरांना हा सिनेमा आवर्जुन बघण्याचं आवाहन देखील करत आहेत.

Tags

follow us