मुंबई : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेची संशयी आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने गंभीर आरोप कोलो आहेत. भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनीच आपल्या मुलीची हत्या केली असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. रविवार, 26 मार्चला वाराणसीतील सारनाथ पोसीस स्टेशन क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचं प्रेत आढळून आलं होतं.
समर सिंह आणि संजय सिंहने आकांक्षाकडून तीन वर्षात कोट्यावधी रूपयांचं काम करून घेतलं. पण पैसे दिले नाही. 21 तारखेलाच समर सिंहचा भाऊ संजय सिंहने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबद्दल स्वतः आकांक्षाने मला फोनवर सांगितले होते. समर सिंह भोजपुरीतील प्रसिद्ध गायक आहेत. 2002 ला त्यांचं पहिलं भोजपुरी गान आलं होत.
आकांक्षा दुबे ही भदोही जिल्ह्यातील चौरी भागात राहणारी आहे. तीन वर्षांची असताना ती तिच्या कुटुंबासोबत मुंबईत आली. तिच्या आई-वडिलांनी तिला आईपीएस ऑफिसर झालेलं पाहु इच्छित होते. पण तिची आवड डान्स आणि अॅक्टिंगमध्ये होती. लहानपणापासून तिला टिव्ही पाहायला आवडायचं. त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीत आली. 2018 मध्ये आकांक्षा डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर ती काही दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण त्यातून सावरत तिने पुन्हा पदार्पण केले.
अभिनेता राम चरणच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?
आकांक्षा दुबेने ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ या चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटांशिवाय तिने अनेक गाण्यांच्या म्यूझिक व्हिडिओमध्ये ही काम केलं. 2021 मध्ये आलेलं ‘तुम जवान हम लाइका’ हे गाणं तिचं सर्वात प्रसिद्ध झालं. तिने खेसारी लाल यादवसह ‘नाच के मालकिनी’ मध्येही काम केलं.