अभिनेता राम चरणच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

अभिनेता राम चरणच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का ?

मुंबई : राम चरण हे नाव साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र RRR चित्रपटानंतर राम चरणची जगभरात लोकप्रियता वाढली. एवढच नाही तर ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या पुरस्कारांवर RRR ने नाव कोरत राम चरण जगभरात ओळखला जाऊ लागला आहे. आत्तापर्यंत आपल्या हटके एक्शन शैली आणि डान्स स्टाईलने राम चरणने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राम चरणच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयीच्या या खास गोष्टी…

राम चरण हा मेगास्टार चिरंजीवींचा मुलगा आहे. चिरुथा या तेलुगू चित्रपटातून राम चरणने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. राम चरण आणि त्याचा परिवार हैदराबादमधील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत. राम चरणची संपत्ती जवळपास 1300 कोटींच्या घरात आहे. हैदराबादमधील जुबली हिल्सच्या प्राईम लोकेशनवर राम चरणचा बंगला आहे. हा बंगला जवळपास 38 कोटींचा आहे.

राम चरणला अभिनयासोबतचा विविध महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे रोल्स रॉईस फॅंटम सारख्या गाड्या आहेत. या गाडीची किंमत जवळपास 7 कोटी इतकी आहे. याशिवाय त्याच्याकडे 3 कोटींची एस्टन मार्टिन कार देखील आहे. शिवाय रेंज रोवरसारख्या गाड्यादेखील आहेत.

राम चरणला घड्याळांची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे बरीच महागडी घड्याळं आहेत. त्याच्याकडे जवळपास 30 घड्याळ्यांचे कलेक्शन आहे. राम चरण हा बिजनेसमन म्हणून देखील काम पाहतो. ट्रूजेट एयलाइंस कंपनीचा तो चेयरमन आहे. या कंपनीत त्याने 127 कोटींची इन्वेस्टमेंट केल्याचं बोललं जातं.

असा आहे जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास

प्रमोशनसाठी राम चरण याच एअरलाईंसच्या प्रायव्हेट जेटचा वापर करतो. हेल्थ सेक्टरमध्येही त्याचा सहभाग आहे. राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला अपोलो लाइफची चेयरमन आहे. राम चरणचा यातही सहभाग आहे.

राम चरण विषयी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची स्वतः ची प्रोडक्शन कंपनी देखील आहे. ज्याचं कार्यालय हैदराबादमध्ये हे. या कंपनीने बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली हे. 2017 मध्ये आलेल्या कैदी नंबर 150, साई रा नरसिम्हा रेड्डी आणि आचार्य यासारख्या चित्रपटांचे प्रोडक्शन या कंपनीने केलय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube