असा आहे जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास

असा आहे जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास

मुंबई : इंग्रजीत ‘थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ असं म्हणतो. याच रंगभूमीसाठीचा दिवस 27 मार्च हा दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन हा 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी हा दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतो.

इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात येते. ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो. जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला एक खास संदेश देतो. हा संदेश सुमारे 50 भाषांमध्ये अनुवादित केला जातो. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. 2002 प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला संदेश देण्याचा मान मिळाला होता.

विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्याआधी महात्मा फुले यांनी अश्वघोष, तृतीय रत्नकार या नाटकांचे लिखाण केले होते. महात्मा फुले यांच्या नाटकाचा प्रयोगच होऊ शकला नाही. ब्रिटिशांनी त्यांना प्रयोग करण्याची परवानगी दिली नव्हती.

Amol Kolhe : अखेर चॅलेंज पूर्ण, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

जगातील पहिले नाटक पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात अथेन्समध्ये पार पडले होते. अथेन्समधील एक्रोपोलिसवरील डायोनिससच्या थिएटरमध्ये हे नाटक रंगवण्यात आले. तर मार्गारेट ह्यूजेस या पहिल्या इंग्रजी थिएटर अॅक्ट्रेस असल्याची नोंद आहे. त्यांनी 8 डिसेंबर 1660 रोजी व्हेरे स्ट्रीट थिएटरमध्ये न्यू किंग्स कंपनीच्या निर्मितीच्या शेक्सपियरच्या ओथेलोमध्ये डेस्डेमोनाची भूमिका साकारली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube