‘…असं केलं, तर विरोधी पक्ष नेतेपद मिळेल’, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंना सल्ला
Uddhav Thackeray Should Merge Party For Opposition Leader Post : राज्यात विधानसभा निवडणुकीचं सुप वाजलंय. जनतेने बहुमताने महायुतीला निवडून दिलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालंय. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे, आता राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने नाकारलं असल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीला यावेळी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतक्या देखील जागा भेटलेल्या नाहीत. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी मिळून केवळ 46 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने 20, कॉंग्रेसने 16 तर शरद पवार गटाने केवळ 10 जागा जिंकल्या आहेत.
मंत्रिपदासाठी महायुतीच्या आमदारांची रस्सीखेच! इच्छुकांचा आकडा वाढला, पुण्यातील यादी समोर
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या जास्त जागा असल्याने ते विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही असल्याचं समजतंय. परंतु निवडणूक आयोगाच्या निकषानुसार आणि कायद्याच्या जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीकडे आमदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही. यावरून आता भाजपचे माजी आमदार आणि कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांना एक उपरोधिक सल्ला दिलाय.
प्रमोद जठार म्हणत आहेत की, “उद्धव ठाकरे यांना आता जर विरोधी पक्ष नेते करायचं असेल, तर त्यांनी उरली सूरलेली उबाठा शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar Group) किंवा काँग्रेसमध्ये (Congress) विलीन करावी . पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं” असं प्रमोद जठार यांनी म्हटलंय. ही माहिती टीव्ही नाईन मराठीच्या हवाल्यानुसार मिळत आहेत. तर महायुतीमध्ये “मुख्यमंत्री पदावरून मकुठलाही वाद नाही. महायुतीचे न्यायाधीश दिल्लीत बसतात” असं देखील प्रमोद जठार यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवीन चेहऱ्याकडे राज्याचे लक्ष
दिल्लीतील न्यायाधीशांनी दिलेला निर्णय महायुतीला मान्य असेल. तो योग्य प्रकारे घेतला जाईल. राज्याला लवकरच मुख्यमंत्री मिळेल, असा विश्वास देखील प्रमोद जठार यांनी व्यक्त केलाय. तर 20 आमदार सांभाळून ठेवा, अन्यथा विसातील शून्य जावून केवळ दोन शिल्लक राहतील, असा खोचक टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
अशी वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून घराच्या बाहेर पडा. संघटनेकडे बघा, पैसे थोडे खर्च करा तरच उद्धव ठाकरे सेना शिल्लक राहील” असा खोचक सल्ला देखील प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. शरद पवारांनी ज्यावेळी जाहीर केलं की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री तेव्हापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट ढासाळायला सुरूवात झालीय. बाळासाहेबांनी कमावलेलं नाव उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि कॉंग्रेसच्या नादाला लागून गमावलं, अशी जहरी टीका प्रमोद जठार यांनी केलीय.