Download App

रुग्णालयात नेणाऱ्या ड्रायव्हरची सैफने घेतली भेट, भेटीनंतर भजन सिंग म्हणाला, ‘सर्वांनीच हात जोडले…’

सैफने त्या रात्री जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकची भेट घेतली होती. भजन सिंग राणा (Bhajan Singh Rana) असं या रिक्षावाल्याचं नाव आहे.

  • Written By: Last Updated:

Bhajan Singh Rana met Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खा (Saif Ali Khan) याच्यावर 16 जानेवारी रोजी राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला झाल्यानंतर सैफ तैमूरला घेऊन एका रिक्षातून लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) पोहोचला होता. आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफने त्या रात्री जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकची भेट घेतली होती. भजन सिंग राणा (Bhajan Singh Rana) असं या रिक्षावाल्याचं नाव आहे. सैफच्या पीएच्या टीमने भजन सिंगसोबत संपर्क साधत त्यांची आणि सैफची भेट घडवून आणली.

“वाळू धोरणात कसूर नाही, अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली”, मंत्री विखेंची सारवासारव 

भजन सिंग राणा या रिक्षा चालकाने सैफला रुग्णालयात नेले होते. त्यामुळे त्याच्यावर वेळेवर उपचार झाले. यानंतर भजन सिंग यांच्या यांच्या अनेक मुलाखती प्रकाशित ते प्रसिद्धीच्या झोतात आले. दरम्यान, भजन सिंग राणा आणि सैफ अली खान यांची भेट झाली. या भेटीविषयी बोलतांना भजन सिंग यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासमवेत सर्वांनीच हात जोडून आपले आभार मानल्याचं सांगितलं.

सैफशी भेट झाल्यानंतर भजन सिंग काय म्हणाले?
ड्रायव्हर भजन सिंग राणा यांनी आयएएनएसला सांगितले की, ‘मला सैफ अली खान यांच्याकून आला होता. त्यांच्या पीएने मला फोन केला होता. भेटण्यासाठीची वेळ ३:३० वाजताची देण्यात आली होती. मी म्हणालो ठीक आहे, मी येऊन जाईल. मात्र, मला जायला थोडा उशीरच झाला. माझी सैफ अली खान सोबत ४-५ मिनिटे भेट झाली. तिथं त्यांचे कुटुंबिय देखील होते. सगळे थॅंक्यू, थॅंक्यू म्हणत होते, जे काही केले ते चांगले केलं, असं कौतूक करत होते. त्यांची आई होती. त्यांची मुलेही तिथं असतीलच. मी तेवढा टीव्ही वगैरे पाहत नाही. मी सैफ अली खानला चरणस्पर्श केला. त्यांच्या आईने हात जोडले, मी त्यांच्या पाया पडलो… सर्वांनी माझा आदर केला. मी एक-दोन फोटोही त्यांच्यासोबत काढले, असं भजन सिंग म्हणाले.

भजन सिंग यांनी त्या रात्रीच्या घटनेबद्दल असेही सांगितले की सैफने त्याला वेदना होत असल्याने हळू गाडी चालवण्यास सांगितले होते.

मला आज सैफ अली खान यांनी आमंत्रित केल्यानं आनंद वाटला. ‘लवकर बरे व्हा, मी तुमच्यासाठी आधी प्रार्थना केली होती आणि आजही प्रार्थना करत आहे, असं सांगत मी त्यांचा निरोप घेतल्याचं भजन सिंग यांनी सांगितलं.

सैफने ड्रायव्हरला ५० हजार रुपये दिले

घटनेच्या दिवशी सैफ अली खानने रिक्षाचालक भजन सिंग राणाला रिक्षाचे भाडे दिले नसले तरी आता त्याने त्याला बक्षीस म्हणून मोठी रक्कम दिल्याचं बोलल्या जातं. असे म्हटले जाते की सैफने भजन सिंगला ५१ हजार रुपये दिले आहेत.

 

follow us