Download App

Bhakshak : जस्मीत गौर बनून बॉलिवुडमधून पुन्हा एकदा वेधलं लक्ष, सईच्या खास भूमिकेचं सर्वत्र कौतुक!

  • Written By: Last Updated:

Bhakshak : मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सई पुन्हा एकदा मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर झळकली. त्यानंतर आता नेटफ्लिक्स वरच्या ‘भक्षक’ (Bhakshak) मधून सईने (Sai Tamhankar) पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. बॉलिवुडमध्ये सईने पुन्हा एकदा पुनरागमन करून भक्षक मधल्या ‘जस्मीत गौर’ या एका पोलिस अधिकाऱ्याची ची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना मोहित करून आपला अभिनय अगदी चोखपणे दाखवून दिला आहे.

Sameer Wankhede : वानखेडेंचा पाय आणखी खोलात; ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल

भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला भक्षक नुकताच रिलीज झाला आणि सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने सगळ्यांना एक खास संदेश सुद्धा दिला. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि स्त्री सक्षमीकरण असलेल्या तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांतून आपण सगळ्यांनी तिला पाहिलं या चित्रपटात तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं जातंय हे देखील तितकच खरं !

Fighter Movie : हृतिक-दीपिकाच्या केमिस्ट्रीने जिंकली मनं, फायटर पोहचला 350 कोटींच्या जवळ

भक्षकमध्ये जस्मीत गौर ही प्रेक्षकांना आपलंसं करणारी ठरली आहे आणि म्हणून सई ने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे. चित्रपटात अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने काम करून सई ने आपला अभिनय अगदी सहजतेने पार पाडला आहे. तिच्या या खास भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

शाहिदचा चित्रपट येताच ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आल असून भक्षक मध्ये एक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी सई अव्वल ठरली आहे.

सईने पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट केला असून भविष्यात सई अजून दर्जेदार काम करणार आहे. 2024 वर्षातला सईचा हा दुसरा प्रोजेक्ट्स आणि तो सुद्धा नेटफ्लिक्स सोबत असल्याने खास ठरला. आगामी काळात सई ताम्हणकर अजून काय दमदार काम करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.

follow us