Half Lion : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao )यांची बायोपिक मालिका(Biopic series) आपल्याला पाहायला मिळणार आहे. अहा स्टुडिओ (Ah studio)आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंटकडून पीव्ही नरसिंह राव यांच्या जीवनावर आधारित मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. त्या मालिकेचं नाव ‘हाफ लायन’ असं असणार आहे. ही मालिका पीव्ही नरसिंह राव यांच्या बायोपिकवर आधारीत आहे. त्यांचं बायोपिक विजय सितापती (Vijay Sitapati)यांनी लिहिलं आहे. त्यावरुनच ही मालिका बनवली आहे.
पूजा सावंतच्या शाही विवाहसोहळाचा थाट; अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, पाहा फोटो
भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणल्याबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या 1991 ते 1996 या कालावधीतील कार्यकाळ आणि त्यांच्या योगदानाचाही सन्मान करतो.
अहा स्टुडिओ आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या, या मालिकेचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश झा करत आहेत. त्या मालिकेचा छोटा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.
DRDO मध्ये नोकरीची संधी, ९० जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?
या टिझरमध्ये माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे विविध फोटो दिसत आहेत. ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत बसून बोलतांना पाहायला मिळत आहेत. टीझरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, आम्ही भारतरत्न विजेते दिवंगत पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या वारसाचा सन्मान करत आहोत. ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अभिमान वाटत आहे.
हाफ लायन मालिकेच्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरु झालं आहे. ही प्रीमियम पॅन इंडिया मालिका हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या मालिकेत पीव्ही नरसिंह राव यांच्या जीवनाचे तसेच राजकीय प्रवासाचे चित्रण केलं जाऊ शकतं.
दिग्दर्शक प्रकाश झा यांनी बॉलिवूडपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम काम केलेलं आहेत. त्यांचा ओटीटीवरील ‘आश्रम’ हा शो सुपरहिट ठरला होता. त्यात अभिनेता बॉबी देओलनं काम केलं. या सुपरहिट मालिकेतील बॉबीच्या कामाचं आणि प्रकाशच्या दिग्दर्शनाचं खूप कौतुक केलं. याशिवाय प्रकाश झा यांनी ‘सत्याग्रह’, ‘आरक्षण’ आणि ‘राजनीती’ सारखे चित्रपट केले आहेत.