बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित करून औदार्य दाखवा; राज ठाकरेंची मागणी

बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित करून औदार्य दाखवा; राज ठाकरेंची मागणी

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांना देखील भारतरत्न घोषित करायला हवं. अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी ट्विट करत केली आहे.

Lal Salaam Box Office: पहिल्याच दिवशी थलायवाच्या ‘लाल सलाम’ची छप्परफाड कमाई!

या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले आहेत की, ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो.

बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.’ असं म्हणत राज यांनी ही मागणी केली आहे.

मॉरिसभाईचं राजकीय कनेक्शन; कोणत्या नेत्यांशी संबंध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्वप्रथम त्यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याचे ट्विट केले होते.याबाबत माहिती देताना त्यांनी लिहिले की, ‘देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते.’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube