सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित #Thalaivar173 चित्रपटाबाबत राजकमल फिल्म्स इंटरनॅशनलकडून मोठी घोषणा

रजनीकांत यांच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे चित्रपट एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देईल; #थलाईवर173 संदर्भात मोठी अधिकृत घोषणा.

Untitled Design   2026 01 03T161246.673

Untitled Design 2026 01 03T161246.673

Big announcement about Superstar Rajinikanth’s much-awaited #Thalaivar173 film : राजकमल फिल्म्स इंटरनॅशनलने सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट #थलाईवर173 संदर्भात मोठी अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक सिबी चक्रवर्ती सांभाळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कमल हसन(Kamal Hasan) आणि आर. महेंद्रन यांच्या निर्मितीखाली तयार होणारा हा चित्रपट राजकमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली साकारला जात असून, रजनीकांत(Superstar Rajanikant) आणि या निर्मिती संस्थेचा हा प्रकल्प प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. दिग्दर्शक सिबी चक्रवर्ती यांची वेगळी कथा मांडण्याची शैली आणि रजनीकांत यांची दमदार स्क्रीन प्रेझेन्स यामुळे हा चित्रपट एक भव्य सिनेमॅटिक अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मी देवेंद्र फडणवीसांना खासगीत नेहमी सांगायचो साहेब, थोडा विचार करा; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्याकडे सोपवण्यात आली असून, रजनीकांत-अनिरुद्ध ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिरकायला लावणारे आणि भावनिक सूर जपणारे संगीत देणार असल्याची खात्री चाहत्यांना आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून, कलाकारांची अंतिम यादी, तांत्रिक पथक, चित्रपटाची कथा, तसेच संपूर्ण निर्मिती वेळापत्रकाबाबतची सविस्तर माहिती योग्य वेळी अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, #थलाईवर173 या घोषणेनंतर सोशल मीडियावर रजनीकांतच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, हा चित्रपट रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version