Download App

Bigg Boss 17: सुशांत सिंगच्या आठवणीत रडताच अंकिता ट्रोल, चाहत्यांनी टोलर्संना दिलं सडतोड उत्तर

  • Written By: Last Updated:

Ankita Lokhande Trolled : सध्याच्या सोशल मीडियाच्या विश्वात कौतुक आणि टीका दोन्ही होते. कधी कौतुक वाट्याला येतं तर कधी टीका. असचं काहीस पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडच्या (Ankita Lokhande) बाबतीत घडलं. अंकिता सोशल मीडियावर ट्रोल होताच तिचे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ऑनलाइन ट्रोल्सविरूद्ध तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला.

अंकिता लोखंडेने यावर्षी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. या घरात अंकितासोबत तिचा पती विकी जैनही आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो अंकिता आणि विकीच्या भांडणामुळे चर्चेत होता. विकीसोबत लग्न करण्यापूर्वी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान, बिग बॉसमध्ये तिने सुशांतसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. ब्रेकअपचे कारणही सांगितले. त्यामुळं सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर अंकिताच्या सगळ्या चाहत्यांनी नकारात्मकतेचा प्रशंसनीय प्रतिकार केला. ट्रोलिंगला तोंड देऊन अंकिताची सकारात्मक बाजू दाखवली आहे.

अकिंता-अभिषेकचा संवाद
अंकिता जेव्हा शोमध्ये सुशांतबद्दल बोलते तेव्हा ती भावूक होते. ताज्या एपिसोडमध्ये सुशांत सिंग राजपूतबद्दल अभिषेकशी बोलताना अंकिता लोखंडे भावूक झाली. अंकिताचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. अंकिता म्हणते की, तो खूप मेहनती होता. त्यानं जो स्ट्रगल केला, त्याला तोडच नाही. हे सांगताना अंकिताच्या डोळ्यात अश्रू तरळतात. अभिषेक कुमार म्हणतो, मी तुझ्याशी सुशांतबद्दल कधीच बोलणार नव्हतो. यावर अंकिता म्हणते, मला या विषयावर बोलायला आवडते. ते दिवस खास होते आणि त्यांच्याबद्दल बोलताना मला नेहमीच अभिमान वाटतो…सुशांत अजिबात आक्रमक नव्हता. तो खूप शांत होता.

सुशांतच्या चाहत्यांनी ट्रोल केले

अंकिता सुशांतसाठी भावूक होत असल्याचे पाहून सुशांतच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. सुशांतचे नाव घेऊन ती सहानुभूती मिळवत आहे, अशी टीका तिच्यावर झाली. लोकांनी अंकिताला ट्रोल करताच तिचे चाहते तिच्या समर्थनासाठी आले.

चाहत्यांनी घेतली अंकिताची बाजू
एका चाहत्याने अंकिताच्या समर्थनार्थ लिहिले – ‘अंकिता- सुशांत बद्दल बोलते तेव्हा छान वाटतं. मला अभिमान वाटतो. सुशांतचे बरेच चाहते अंकिताला ट्रोल करत आहेत. पण त्यांना सुशांतचे प्रेम कधीच समजले नाही.’

तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले – ‘बिग बॉस 17 मध्ये अंकिता सुशांतबद्दल बोलत आहे. तिचं अजूनही सुशांतवर प्रेम आहे. त्याच्या आठवणीत ती रडत आहे.

Tags

follow us