आज खरं बोलण्याचा दिवस आहे; दिशा अन् सुशांतचं नाव घेत नितेश राणेंचं ठाकरेंना चॅलेंज

  • Written By: Published:
आज खरं बोलण्याचा दिवस आहे; दिशा अन् सुशांतचं नाव घेत नितेश राणेंचं ठाकरेंना चॅलेंज

मुंबई : आज संपूर्ण राज्यासह देशभरात दसऱ्याचा (Dasera Festival) सण मोठा उत्सवात साजरा केला जात असून, दुपारी पंकजा मुंडे (Pankaja Mude) आणि संध्याकाळी उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजप नेते नितेश राणेंनी उद्ध ठाकरेंना आज खर बोलण्याचा दिवस आहे असे म्हणत दिशा सालियान आणि सुशांतसिग राजपूत यांच्या प्रकरणात तुमचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे होता की नव्हता हे खरं सांगण्याची हिम्मत दाखव म्हणत चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे आता दिशा आणि सुशांतसिंग राजपुत प्रकरणावर उद्धव ठाकरे बोलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“मनाला पटत नाही तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही” : नारायण राणेंच्या पुत्राची राजकारणातून निवृत्ती

आदित्य ठाकरे रोहित पवारांवर जोदरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरेंना चॅलेंज देण्याबरोबरच यावेळी नितेश राणेंनी (Nitesh Rane) आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, यावर्षी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांचा आजचा दसरा मेळावा हा शेवटचा मेळावा असेल. कारण दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंना आता भिती वाटू लागली असल्याचे राणे म्हणाले.

याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) लक्ष करत स्वतः च्या आयुष्यासाठी ही संघर्ष यात्रा काढत असेल असे म्हणत रोहित पवारांना काही कामधंदे राहिले नसल्याची बोचरी टीका यावेळी नितेश राणेंनी केली. संघर्षयात्रा काढण्यापेक्षा त्यांनी चारधाम यात्रा काढावी, असा सल्लादेखील यावेळी नितेश राणे यांनी रोहित पवारांना दिला आहे.

Rohit Pawar : ‘माझ्या मतदारसंघातही हेच झालं’; रोहित पवारांची राम शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

दसरा मेळाव्याच्या टीजरवरून सोडलं टीकास्त्र

आजच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मुंबईतील शिवाजी पार्कवर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाकडून सभेचे काही टीझर सादर करण्यात आले होते. यावरून राणेंनी टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, तुमच्या टीजरमध्ये तुम्हाला सांगावं लागते की, आदित्य आणि उद्धवला सांभाळा असे सांगण्याची नामुष्की येते याशिवाय दुसरं दुर्देव काय, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला. सगळ्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळायचे मग महाराष्ट्र कधी सांभाळायचा? असा खोचक प्रश्नदेखील नितेश राणेंनी यावेळी उपस्थित केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube