Download App

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन! हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest : बिग बॉस (Bigg Boss) 13 फेम शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( Shefali Jariwala Death) झालंय. शेफालीने वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘कांटा लगा’ या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या शैफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गंभीर आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने, तिचे पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात (Cardiac Arrest) घेऊन गेले. जिथे तिला पोहोचताच मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेफाली जरीवालाच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. त्यांनी म्हटलंय की, शैफालीचा पती तिला अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात घेऊन आला होता. परंतु डॉक्टर तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला होता. त्यांनी या संदर्भात रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विजय लुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. नंतर, रुग्णालयातील दुसरे डॉक्टर सुशांत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. शैफाली जरीवालाच्या प्रकृतीबाबत अशी कोणतीही बातमी समोर आलेली नाही. आतापर्यंत मिळालेल्या अपडेट्सनुसार, शैफालीने 3 दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते.

‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार खास, मिळणार मोठ्या संधी

शेफाली जरीवाला खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. 2002 मध्ये तिने आशा पारेख यांच्या चित्रपटातील कांटा लगा या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला. हे गाणे ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात वापरले गेले होते. युट्यूबवर त्याला सुमारे 100 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे रिलीज झाले, तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि विरोधालाही सामोरे जावे लागले. शैफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की, तिला स्वतःला ‘कांटा लगा गर्ल’ असे संबोधले जाऊ लागले. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो ‘बिग बॉस 13’ मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’ केला. त्याच वेळी ती ‘हुडुगारू’ नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती.

शैफालीच्या अचानक निधनाने मनोरंजन विश्वात आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. गायक मिका सिंगने शेफालीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्याने शेफालीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, मला याचा धक्का बसला आहे. आमची लाडकी कलाकार आणि माझी प्रिय मैत्रीण शैफाली जरीवाला आपल्याला सोडून गेली आहे.

follow us