Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि मन्नार चोप्रा हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले. यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.
डोंगरी ते बिग बॉस प्रवास…: मुनव्वरचं बालपण गुजरात मधील जुनागढमध्ये गेलं. 2002 मध्ये उसळलेल्या दंगलीत मुनव्वरचं संपूर्ण घर जमीन उद्धवस्त झालं. वयाच्या अवघ्या 16 वर्षी मुनव्वरच्या डोक्यावरून आईचं छत्र देखील हरपलं. पुढे मुनव्वर आणि त्याच्या तीन बहिणींना घेऊन त्याचे वडील महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील डोंगरी भागात राहायला आले. पण इथे आल्यावर देखील त्यांचे संघर्षाने पाठ सोडली नाही. वडिलांच्या सततच्या आजारपणामुळे त्याला घराची जबाबदारीचं ओझं अंगावर पेलावं लागलं.
हातावरील पोट असल्याने घरातील खर्च भागवण्यासाठी त्याने एका भांड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. ग्राफिक्स डिझायनिंग तो करू लागला. यातूनच त्याला त्याच्यातील कलाकार सापडला. कारण पोस्टरवर एका ओळीची पंचलाईन असते. त्या ओळी लिहिताना मुनव्वरला जाणवलं की, आपण छान लिहू शकतो.
Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारूकी ठरला बिग बॉसचा महाविजेता!, अभिषेक कुमार राहिना रनर अप
पुढे त्याची पावलं स्टँडअप कॉमेडीकडे वळाली. त्याच्या शोला अनेक लोक गर्दी करू लागले. त्याच्या पंचला लोक रिस्पॉन्स देखील देऊ लागले. यूट्यूबवर त्याच्या या शोला मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली. पुढे कंगना रनौतचा ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो आला. आणि त्याला त्या शोमध्ये बोलावलं गेलं. तो सहभागी झाला अन् जिंकला सुद्धा… मात्र 2021 मध्ये मध्य प्रदेशमध्ये त्याचा एक शो झाला. यावेळी त्याने धार्मिक भावना दुखावल्या, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणी मुनव्वरला अटक झाली. नंतर सर्वोच्च न्यायालयात त्याच्या जामीनासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला. 35 दिवस मुनव्वर तुरुंगात होता. पण तुरुंगाबाहेर येताच त्याची लोकप्रियता आणखी वाढली. आधी लॉक अप आणि त्यानंतर आता बिग बॉसचं विजेतेपद मुनव्वरकडे आलं.
बिग बॉसच्या घरामध्ये प्रेम, दुश्मनी, खेळ अशा सर्वच गोष्टी घडत असतं. असं असताना देखील तुम्ही तिथे टिकून राहणं महत्वाचं ठरतं. तगडे प्रतिस्पर्धी असताना देखील मुनव्वर खेळला, आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली अन् जिंकला. बिग बॉस 17 च्या विजेतेपदाचा किताब मुनव्वरच्या नावावर आहे. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत मुनव्वरने ट्रॉफी जिंकली. अन् बिग बॉस 17 ची ट्रॉफी डोंगरीत आली.