Bigg Boss फेम जय दुधाणेच्या गाडीतून चोरी; घटनेबद्दल अभिनेताने सांगितली आपबिती 

Jay Dudhane: ‘बिग बॉस मराठी ३’ (Bigg Boss Marathi 3) फेम जय दुधाणेची (Jay Dudhane) कारमधून बॅग चोरीला गेली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (१० जुलै) रोजी रात्री घडल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. चोरट्याने चक्क कारची काच फोडून बॅग चोरली आहे. जयने घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती सोशल मीडियावरून (Social media) आपल्याला चाहत्यांना दिली आहे. […]

Jay Dudhane

Jay Dudhane

Jay Dudhane: ‘बिग बॉस मराठी ३’ (Bigg Boss Marathi 3) फेम जय दुधाणेची (Jay Dudhane) कारमधून बॅग चोरीला गेली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (१० जुलै) रोजी रात्री घडल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. चोरट्याने चक्क कारची काच फोडून बॅग चोरली आहे. जयने घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती सोशल मीडियावरून (Social media) आपल्याला चाहत्यांना दिली आहे.


या घटनेची माहिती त्याने इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. जयने शेअर केलेल्या फोटोत कारची काच फोडल्याचे दिसून येत आहे. जयने त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की, तो सुरक्षित आहे. परंतु त्याची महागडी बॅग चोरीला गेली आहे. मित्रांनो, मी व्यवस्थित आहे आणि माझी विचारपूस केल्याविषयी मनापासून आभार. कोणीतरी माझ्या गाडीची काच फोडली आणि बॅग चोरी करून पळून गेले आहे.

तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करत असताना थोडं सावध राहा, असं त्याने यावेळी सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयने आपली कार पार्किंगमध्ये उभी केली होती. यानंतर तो काही कामासाठी गेला होता आणि नंतर चोरट्याने कारची काच फोडून कारमधून बॅग चोरली आहे. या धक्कादायक घटनेनंतर जयने आपल्या चाहत्यांना त्यांच्या कार पार्क करत असताना सतर्क राहण्याचे सल्ला दिला आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

दरम्यान सेलिब्रिटींच्या गाड्यांमधून चोरी होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. याअगोदर देखील निया शर्मा आणि कौशांक अरोरा यांच्यासह अनेक हिंदी मराठी सेलिब्रिटींच्या कारमधून त्यांच्या बॅग चोरीला गेल्या आहेत आणि त्यांनी त्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version