Download App

ढोलताशांच्या गजरात ‘बिग बॉस मराठी’ची तारीख होणार ‘आज’ जाहीर; नवा प्रोमो येताच चाहते म्हणाले…

Bigg Boss Marathi 5 : ज्याची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत तो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Date Declare : ज्याची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत तो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. (Bigg Boss Marathi 5) यंदाच्या सीझनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) ठिकाणी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) शो होस्ट करताना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी 5 चा धमाकेदार प्रोमो येत आहे. यात रितेश भाऊंचा लूकही रिव्हील करण्यात आला आहे. मात्र नक्की ‘बिग बॉस मराठी 5’ कधी सुरु होणार याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागली आहे.


कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी 5’ चा आणखी एक धमाकेदार प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत अखेर एक दिलासा दिला आहे. तो म्हणजे आज संध्याकाळी बिग बॉस मराठी 5 कधी सुरु होणार याची तारीख जाहीर होणार आहे. अखेर प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते ती आता संपली आहे.

आज संध्याकाळी बिग बॉसची 5 ची डेट जाहीर करण्यात येणार आहे. “होणार ढोल ताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर! आज संध्याकाळी, जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’. मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच…फक्त कलर्स मराठीवर” असं म्हणत नवीन धमाकेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘खूप वाट पाहिल्यानंतर आज तारीख कळेल खूप उत्सुकता आहे’ अशी कमेंट सध्या त्या पोस्टवर मिळत आहे.’ रितेश भाऊमुळे शो सुपरहिट होणारच यात काडीमात्र शंका नाही, पहिलं प्राधान्य मराठी बिग बॉसला’ असं म्हणत रितेश देशमुखचं जोरदार स्वागत करण्यात आला आहे.

Video: ‘तंटा नाय तर घंटा नाय’ रितेश भाऊचा ‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो प्रदर्शित

रितेश देशमुखने आजवर आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांना ‘वेड’ लावलं आहे. पण आता टेलिव्हिजनचा पडदा व्यापून टाकायला, ‘बिग बॉस’ मराठीचा हा नवा सीझन गाजवायला तो सज्ज झाला आहे. रितेश भाऊच्या येण्याने ‘बिग बॉस’च्या घरात जबरदस्त कल्ला होणार असल्याचे वाटत आहे. एकंदरीतच आपल्या मराठमोळ्या रितेश भाऊमुळे ‘बिग बॉस’ आणखी ग्रँड होणार अशी चर्चा देखील होत आहे.

follow us