Video: ‘तंटा नाय तर घंटा नाय…’; रितेश भाऊचा ‘बिग बॉस मराठी 5’ चा नवा प्रोमो प्रदर्शित

Video: ‘तंटा नाय तर घंटा नाय…’; रितेश भाऊचा ‘बिग बॉस मराठी 5’ चा नवा प्रोमो प्रदर्शित

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh Promo Release: ‘बिग बॉस’म्हणजे (Bigg Boss Marathi) मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. ‘कलर्स मराठी’ (Colors Marathi) आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) ‘बिग बॉस’ आणखी ग्रँड होणार असल्याचं पाहायला मिळाले. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा हटके प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi


‘बिग बॉस मराठी 5’ चा नवीन प्रोमो प्रदर्शित

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या हटक्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची ‘लयभारी’ स्टाईल बघायला मिळाली आहे. अन् आता नव्या प्रोमोमध्ये देखील त्याचा डायशिंग स्वॅग बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भाऊ सज्ज झाला आहे. नव्या प्रोमोमध्ये रितेश म्हणतोय की, “तंटा नाय तर घंटा नाय… ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच… तो पण माझ्या स्टाईलने” अशाप्रकारे रितेशचा भन्नाट अंदाजातला व्हिडिओ बघायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi: आता बिग बॅासच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार… आणि रितेश भाऊच्या स्टाईलने सिझन गाजणार

‘बिग बॉस मराठी 5’ लवकरच

महाराष्ट्रात लवकरच मराठी ‘बिग बॉस’चा आवाज घुमणार आहे. अनोखा असा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’कडे बघितले जाते. हा भन्नाट रिअॅलिटी कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे तेवढाच आव्हानात्मक असतो. या पर्वात देखील एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अफलातून गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळत असतात.

तसेच रितेश भाऊ आता आपल्या हटक्या अंदाजात यंदाच्या सीझनची सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज