Bigg Boss Marathi: आता बिग बॅासच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार… आणि रितेश भाऊच्या स्टाईलने सिझन गाजणार

Bigg Boss Marathi: आता बिग बॅासच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार… आणि रितेश भाऊच्या स्टाईलने सिझन गाजणार

Bigg Boss Marathi Ritesh Deshmukh Promo Release: ‘बिग बॉस’म्हणजे (Bigg Boss Marathi) मनोरंजनाचा बादशाह असलेला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम. ‘कलर्स मराठी’ (Colors Marathi) आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) ‘बिग बॉस’ आणखी ग्रँड होणार असल्याचं पाहायला मिळाले. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा हटके प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi


हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यंदा बिग बॉस मराठी 5च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे अफलातून धमाल आणि कल्ला आता बिग बॉस मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची ‘लयभारी’ स्टाईल पाहायला मिळाली. अन् आता नव्या हलक्या प्रोमोमध्ये देखील त्याचा कमाल स्वॅग दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील काही स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भावाची एन्ट्री होणार आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय की,”तंटा नाय तर घंटा नाय… ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच… तो पण माझ्या स्टाईलने”, अशा हटक्या स्टाईलने बोलत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा आवाज घुमणार आहे. अनोखा असा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे बघितलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वात देखील एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना पाहायला मिळणार आहेत. तसेच रितेश भाऊ आपल्या अनोख्या अंदाजात अनेकांना झटका देणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीतून महेश मांजरेकरांचा पत्ता कट, ‘हा’ बॉलिवूड अभिनेता करणार शो होस्ट

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची घोषणा झाल्यापासून जोरदार चर्चा सुरु आहे. आता नवा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या सिझनच्या प्रदर्शनाची डेट देखील घोषीत करण्यात आली की नाही? हे सर्वजण बघत होते. पण अद्याप सिझनच्या प्रदर्शनाची डेट समोर आली नसल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube