जेनिलियानंतर Ritesh Deshmukh चं ही ओटीटीवर पदार्पण; ट्रेलरने वाढवली उत्सुकता

जेनिलियानंतर Ritesh Deshmukh चं ही ओटीटीवर पदार्पण; ट्रेलरने वाढवली उत्सुकता

Ritesh Deshmukh Debut in series Pill trailer release : रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांची भूमिका असलेली मानवी भावना आणि नाट्याने भरलेली पिल (Pill ) ही सीरिज जिओसिनेमावर 12 जुलैपासून सुरू होत आहे. या सीरिजबद्दल उत्कंठा वाढवणारे पोस्टर काही दिवसांपूर्वीच सादर झाले होते. त्यानंतर आता या सीरिजचा ट्रेलर (trailer release) आला आहे. आपल्या रोजच्या आरोग्यदायी जगण्याशी संबंधित फार्मास्युटिकल किंवा औषध उद्योगक्षेत्राचे जग नेमके कसे आहे, याची एक झलक या ट्रेलरमधून पहायला मिळते. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मुव्हीज यांची निर्मिती आणि राज कुमार गुप्ता यांनी निर्मिलेल्या पिल या सीरिजमध्ये पवन मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

Akshay Kumar च्या ‘सरफिरा’ चं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; राधिका मदानसह अक्षयचा रोमॅंटीक अंदाज

पिलमध्ये आपली ओळख होते प्रकाश चौहान या व्यक्तिरेखेशी. ही व्यक्तिरेखा रितेश देशमुख यांनी साकारली आहे. भारतातील फार्मास्युटिकल जगताच्या मुळाशी असलेल्या रहस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही व्यक्तिरेखा करते. बलाढ्या फार्मा उद्योजक, भ्रष्टाचारी डॉक्टर्स ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, स्वत:चा फायदा पाहणारे औषध नियामक, राजकारणी, पत्रकार आणि या सगळ्या विरोधात आवाज उठवणारे अशा अनेक माणसांच्या माध्यमातून् ही कथा पुढे सरकते.

अजित पवार आमच्या बोकांडी बसले, त्यांना महायुतीतून बाहेर काढा…; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

पवन मल्होत्रा यांनी साकारलेल्या फार्मा कंपनीच्या सीईओचा सामना प्रकाशशी होतो आणि यातूनच सुरुवात होते रुग्णांऐवजी फायद्याला महत्त्व देणाऱ्या या बलाढ्य चक्रातील सत्य शोधून काढण्यास. योग्य आणि अयोग्याच्या या लढाईत सत्य शोधून काढण्याच्या प्रकाशच्या प्रयत्नांमुळे सामान्य माणूस जागरुक होईल आणि प्रत्येक जण जिथे औषधे आणि लसींच्या साह्याने जगू पाहतोय अशा जगात अधिक सजग बनेल, अशी एक आशा निर्माण होते.

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

सीरिजमध्ये पदार्पण करण्याबाबत रितेश देशमुख म्हणाले, “डिजिटल स्ट्रीमिंगच्या जगात पदार्पण करताना मला आनंद वाटतोय. पिलसारखी रोमांचक आणि महत्त्वाची कथा असते तेव्हा त्या कथेला पूर्ण न्याय देण्याची फार मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. आपलं दैनंदिन आयुष्य आणि एकूणच आरोग्यावर प्रचंड परिणाम करणारी एखादी गोळी ही खरंतर सामान्य बाब आहे. पण, त्यातील ही प्रचंड गुंतागूंत समजून घेणे फार औत्सुक्याचे होते. हा प्रवास बरंच काही शिकवणारा होता. या सीरिजमध्ये आपले सर्वस्व ओतणाऱ्या राज कुमार गुप्ता आणि रॉनी स्क्रूवाला यांच्यासारख्या द्रष्ट्यांसोबत काम करणे हा खरेतर माझाच सन्मान आहे. प्रकाश चौहान ही व्यक्तिरेखा म्हणजे साधेपणा आणि हिमतीचा मेळ आहे. फार्मा कंपन्यांमधील भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई प्रेक्षकांनाही आपलीशी वाटेल, असा मला विश्वास आहे.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube