Download App

Bigg Boss Marathi : नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट?

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 11 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi) आज दुसरं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. (Bigg Boss Marathi New Season) या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत (Abhijit Sawant) आणि छोटा पुढारी (Ghanshyam Darwade) एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. तसेच नॉमिनेट (nominated) झालेल्या कोणत्या सदस्याला बिग बॉस सेफ करणार हे पाहावे लागेल.


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी-योगिता, निखिल-सूरज, वर्षा-जान्हवी, अरबाज-धनंजय, वैभव-इरिना, आर्या-अभिषेक, वर्षा-घन:श्याम अशा जोड्या बनलेल्या दिसत आहेत. घरातील सदस्यांनी अंडी, कांदा-बटाटा अशा अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. दरम्यान अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.

अंडी, बटाटा आणि कांदे अशा अनेक गोष्टी ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांनी नॉमिनेट केल्याने घरात जेवण बनवायचे वांदे होणार आहेत. सदस्यांचे झालेले वांदे पाहायला प्रेक्षकांना मात्र मजा येणार आहे.

Bigg Boss Marathi: बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात?

बिग बॉसच्या घरात घन:श्यामने म्हणजेच छोट्या नेणे आपल्या हजरजबाबीपणाने लोकांची मने जिंकली आहेत. घन:श्याम सध्या अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांच्या ग्रुपमध्ये वावरत आहे. पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये घरात जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? तिला घरातील लोक साथ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us