Bigg Boss Marathi : जान्हवीने आर्याला सुनावलं, तू घाणेरड्यासारखंच… नेमकं काय झालं?

पुन्हा नव्याने मैत्री करणाऱ्या जान्हवी आणि आर्यामध्ये जोरदार वादावादी झाली आहे. बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले आहेत.

Bigg Boss Marathi : जान्हवीने आर्याला सुनावलं, तू घाणेरड्यासारखंच... नेमकं काय झालं?

Bigg Boss Marathi : जान्हवीने आर्याला सुनावलं, तू घाणेरड्यासारखंच... नेमकं काय झालं?

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले आहेत. बिग बॉसचा खेळ आता सातव्या आठवड्यात पोहचला आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल, याचा काही नेम नाही. (Bigg Boss ) मैत्रीच्या नात्यात कधी बदल होईल, समीकरणे सतत बदलत असतात. आता, पुन्हा नव्याने मैत्री करणाऱ्या जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधवमध्ये जोरदार खडजंगी झाली आहे. जान्हवीने तर आर्याला थेट ”तू घाणेरड्यासारखंच राहा” असंच सुनावलं आहे.

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज वर्षा ताईंना लावतोय मस्का; म्हणालातुम्ही सर्वात सुंदर

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून सदस्यांच्या भांडणांना सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी आणि आर्याचे कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, जान्हवी आर्याला म्हणत आहे,”तुला वॉशरुम साफ करता येत नाही… भांडी घासता येत नाही…करता काय येतं मग तुला?”. त्यावर आर्या जान्हवीला म्हणते,”तू स्वत: पहिले क्लिन कर”. जान्हवी पुढे म्हणते,”मला चूक दिसली तर दिसली आर्या. तुला घाणेरड्यासारखं राहायला आवडतं तर घाणेरड्यासारखचं राहा” असे सुनावते.

Exit mobile version