Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरात लागलाय तडका, जान्हवी आणि सूरजचा ‘गुलीगत’ झगडा

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी’च्या घरात लागलाय तडका, जान्हवी आणि सूरजचा ‘गुलीगत’ झगडा

Bigg Boss Marathi New Season Day 9 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच (Bigg Boss Marathi New Season) गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील (Purushottamdada Patil) घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही 15 सदस्यांची ‘कल्लाकारी’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींचं नॉन स्टॉप मनोरंजन होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आणि गोलीगत सूरज चव्हाण (Suraj Chavan) या दोघांमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणतेय,”तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहानपणा करायचा नाही”. त्यावर गोलीगत सूरज जान्हवीला म्हणतो,”तू निघ… चल फूट”.

गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने काही सदस्यांची जोरदार शाळा घेतली. त्यामुळे या आठवड्यात हे सदस्य कसा खेळ खेळणार? खेळ खेळताना एकमेकांसोबत कसे वागणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिना गिरवतेय मराठीचे धडे

पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशनचा वार

बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यामध्येच एलिमिनेशनचा वार झाला आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार आणि किर्तनकार पुरुषोत्तम पाटील हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. त्यापैकी किर्तनकार पुरुषोत्तम पाटील यांना बिग बॉसच्या घरातून आता बाहेर पडावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube