Download App

Bigg Boss Marathi: पाताळलोकात खतरनाक गेम रंगणार, दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार?

Bigg Boss Marathi New Season Day 33 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आज सोन्याची नाणी शोधायला पाताळलोकात जाणार आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 33 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज (Bigg Boss Marathi New Season) सोन्याची नाणी शोधायला पाताळलोकात जाणार आहेत. (Bigg Boss Marathi ) आता या सगळ्यात कोण कोणावर भारी पडणार हे जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस’प्रेमी उत्सुक आहेत. आज या पाताळलोकात एक खतरनाक गेम रंगणार आहे. सदस्य एकमेकांचा पाय खेचताना दिसणार आहेत. दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार हे पाहावे लागेल.


‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) टीम A आणि टीम B मधील सदस्य पाताळलोकात सोन्याची नाणी शोधताना दिसत आहेत. सोन्याची नाणी शोधून सदस्यांना ती जपायचीदेखील आहे. त्यामुळे प्रोमोमध्ये सदस्य एकमेकांचे हातपाय खेचतानादेखील दिसत आहेत. सोन्याची नाणी शोधण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळणार आहे. सदस्यांचा हा टास्क पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

सोन्याची नाणी शोधायला, कोण कोणावर पडणार भारी?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कमाल टास्क पार पडणार आहे. प्रोमोमध्ये म्हटलं जात आहे,”पाताळलोकात सदस्यांना शोधावी लागणार सोन्याची नाणी”. दरम्यान टास्कमध्ये अरबाज आर्याला म्हणतोय,”आर्या आपले कमी आहेत..लवकर नाणी आण”. दरम्यान कॅप्टन निक्की मात्र टीम B ची नाणी वॅलिड नाही असं म्हणते. यावर डीपी दादा म्हणतात,”खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर”. तर अभिजीत म्हणतो,”यापुढे मला पार्टनर बनयाचं नाही”.

अभिजीतच्या या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचं कौतुक करत त्याला सॅल्युट देताना दिसून येतात. अभिजीत आणि निक्कीची एक जोडी होती. पण आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्याने त्याने तिला सोडलं असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Bigg Boss Marathi: सगळे जाणार पाताळलोकात शोधायला सोन्याची नाणी, कोण कोणावर पडणार भारी?

अभिजीत सावंतने ‘बिग बॉस’चा नियम मोडला?

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi New Promo) सदस्यांना दिलेल्या जोड्यांमध्येच फिरण्याचा आदेश बिग बॉसने दिला आहे. पण अभिजीत सावंत (Abhijit Sawant) एकटा फिरत असल्याने सूरज त्याला म्हणतोय,”अभि दादा आत बस”. अभिजीतला छोटा पुढारी म्हणतोय,”जोडीशिवाय फिरू शकत नाही”. त्यावर अभिजीतने थेट सुनावले आहे की,” मला बोलतील बिग बॉस’. त्यावर घन:श्याम म्हणतो,”पण तुम्ही नियम मोडू नका”. तर आर्या देखील अभिजीतच्या हालचालीवर म्हणते की, “तुम्ही तुमचे शब्द बोलताय की निक्कीचे. दोन दिवसांत अभिजीत सावंत पू्र्णपणे बदलला आहे”. निक्की अभिजीतला पुढे म्हणते,”मी तुला चार दिवसांत ओळखू शकते तर ते ओळखू शकत नाहीत का?”.

follow us