Download App

Bigg Boss Marathi: नवीन टास्क म्हणजे नवीन कल्ला होणार, बोटीत बसून कोण घराचा कॅप्टन बनणार?

Bigg Boss Marathi New Season Day 18 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नॉमिनेशन टास्क, कॅप्टनसी टास्क असे अनेक रंगतदार टास्क रंगत असतात.

Bigg Boss Marathi New Season Day 18 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात (Bigg Boss Marathi ) नॉमिनेशन टास्क, कॅप्टनसी टास्क असे अनेक रंगतदार टास्क रंगत (Captaincy Task) असतात. (Bigg Boss Marathi New Season ) आज घरात एक भन्नाट कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. नव्या आठवड्यातील नव्या टास्कदरम्यान घरातील सदस्य चांगलाच कल्ला करताना दिसणार आहे. बोटीत बसून घराचा कॅप्टन (Captain) कोण बनणार हे ठरणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये, सदस्य बोटीत बसून बोटी शोधाताना दिसत आहेत. बोटी शोधण्यासह त्यांना कॅप्टनपदाचे उमेदवार बाजूला करायचे आहेत. प्रोमोमध्ये या टास्कदरम्यान अभिजीतला दुखापत झालेली दिसून येत आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये कोणता सदस्य बाजी मारणार हे काही तासांतच कळेल.


निक्कीसाठी घरातील कच्चा लिंबू कोण असेल?

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि जान्हवी त्यांना वाटत असलेल्या घरातील कच्चा लिंबूबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. निक्कीसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कच्चा लिंबू रॅपर आर्या जाधव आहे. निक्कीने आर्याचं नाव घेत बिग बॉसला देखील याबद्दल सांगितलं आहे.

‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

Bigg Boss Marathi: घरात आलेल्या दोन छोटे पाहुण्यांमुळे, निक्कीचं ‘बाई’ झालं ‘आई’

किरण मानेची खास पोस्ट?

मराठमोळा अभिनेता किरण माने यांनी रितेशसाठी लिहिलेल्या खास पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘कुणाविषयी कुठलाही पुर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीनं बिग बॉस होस्ट करतो आहेस. मराठीला पहिल्यांदा बिग बॉस हा खेळ उमजलेला होस्ट लाभला आहे. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरुन कुणावर उगाचंच चिखलफेक नाही. केवळ ‘स्वत:ला आवडतात म्हणून’ न खेळणार्‍या निष्क्रीय लोकांना डोक्यावर घेणे नाही.सगळं जिथल्या तिथं. जसं आहे तसं. आरशासारखं. लख्ख.’

follow us