Download App

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात ‘या’ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi New Season Day 18 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) आणि नॉमिनेशन हे (Nomination) जणू एक समीकरणच झालं आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 18 : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) आणि नॉमिनेशन हे (Nomination) जणू एक समीकरणच झालं आहे. घरातील सदस्य स्वत:ची प्रगती करत पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. सदस्य यासाठी घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करतात. (Bigg Boss Marathi New Season) ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली असून यात काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तिसऱ्या आठड्यात कोणत्या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे हे पाहावे लागेल.


‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात अरबाजने (Arbaaz Patel) निक्कीला ( Nikki Tamboli ) सेव्ह केलं. अभिजीतने पॅडीला सेव्ह केलं. या नॉमिनेशन कार्यात टीम A विजयी झाली. कालच्या भागात वैभवने (Vaibhav Chavan) घन:श्यामला सेफ करुन अभिजीतला नॉमिनेट केल्याचं निक्की, अरबाज आणि जान्हवीला पटलेलं नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की वैभवला म्हणत आहे,”तू खूप चुकीचा निर्णय घेत आहेस. तू आर्यासोबत भांडतोस..तुला तिला नॉमिनेट करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती”. पुढे निक्की वैभवला म्हणते,”वैभवला नाही जमत गेम खेळायला.

किरण मानेची खास पोस्ट?

मराठमोळा अभिनेता किरण माने यांनी रितेशसाठी लिहिलेल्या खास पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘कुणाविषयी कुठलाही पुर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीनं बिग बॉस होस्ट करतो आहेस. मराठीला पहिल्यांदा बिग बॉस हा खेळ उमजलेला होस्ट लाभला आहे. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरुन कुणावर उगाचंच चिखलफेक नाही. केवळ ‘स्वत:ला आवडतात म्हणून’ न खेळणार्‍या निष्क्रीय लोकांना डोक्यावर घेणे नाही.सगळं जिथल्या तिथं. जसं आहे तसं. आरशासारखं. लख्ख.’

Bigg Boss Marathi: घरात आलेल्या दोन छोटे पाहुण्यांमुळे, निक्कीचं ‘बाई’ झालं ‘आई’

‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

follow us