Download App

Bigg Boss Marathi: निक्की आणि अरबाजमध्ये कोणामुळे उडतायेत खटके? जाणून घ्या…

Bigg Boss Marathi New Season: 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 19 : ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना (Bigg Boss Marathi) दिसणार आहेत. घरातील हा दंगा पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येईल. (BB Marathi) निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.


प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की अरबाजला हात जोडून विनंती करत म्हणतेय,”अरबाज घराकडे जा…माझ्याकडे येऊ नको”. पुढे अरबाज निक्कीला म्हणतो,”तुझ्यासोबत जसं मी वागतो तसचं आता मी त्याच्यासोबत वागणार”. त्यानंतर निक्की घन:श्याम आणि वैभवला म्हणते,”अरबाज ‘त्या’ मुलीकडे कसा जाऊ शकतो? ज्या मुलीच्या विरोधात मी गेले होते. त्याला ट्रॉफी द्या नाहीतर वेड लागेल त्याला”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वादाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सगळे सदस्य आता आपल्या मुद्द्यासाठी भांडत आहेत. सदस्यांचे खरे रंग आता प्रेक्षकांना दिसायला लागले आहेत.

निक्कीसाठी घरातील कच्चा लिंबू कोण असेल?

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि जान्हवी त्यांना वाटत असलेल्या घरातील कच्चा लिंबूबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. निक्कीसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कच्चा लिंबू रॅपर आर्या जाधव आहे. निक्कीने आर्याचं नाव घेत बिग बॉसला देखील याबद्दल सांगितलं आहे.

Bigg Boss Marathi: नवीन टास्क म्हणजे नवीन कल्ला होणार, बोटीत बसून कोण घराचा कॅप्टन बनणार?

‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

follow us