Download App

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या; कोण होणार कॅप्टन

Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या (Bigg Boss Marathi New Season) सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 20 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या (Bigg Boss Marathi New Season) सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. (Bigg Boss Marathi) आजच्या भागात कॅप्टनसीचा टास्क पार पडताना पाहायला मिळणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की (Nikki) आणि योगिता (Yogita) एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.


नॉमिनेशन टास्क असो वा कॅप्टनसीचा…

कोणत्याही टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळते. आजच्या भागाच्या कॅप्टनसी टास्कदरम्यानचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि योगिता आमने-सामने येऊन टास्कमध्ये टक्कर देताना दिसत आहेत. आजच्या भागात टीम B मधील सदस्य गार्डन एरियामध्ये गेम प्लॅनबद्दल भाष्य करताना दिसणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा कॅप्टनसी टास्क खूपच रंगतदार असणार आहे. कोण होणार ‘बिग बॉस मराठी’चा नवा कॅप्टन याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

तो आला… अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश भाऊ. ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार असल्याची घोषणा झाल्यापासून चाहते त्याच्या नव्या सीझनबद्दल खूप उत्सुक झाल्याचे पाहायला मिळाले होते. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल ‘बिग बॉस’प्रेमींच्या खूपच पसंतीस उतरली. टीआरपी रेटिंगवर होत असलेल्या वर्षावाने याची कबुली दिली आहे.

Bigg Boss Marathi: ‘माझा लय गावठी पॅटर्न हाय’,गोलीगत सूरज चव्हाण असं का म्हणाला?

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने चांगलाच इतिहास रचला आहे. मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने या आठवड्यात 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त ‘बिग बॉस मराठी’ आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसत आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत 2.4 TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग 2.8 TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचं वेड लागल्याचे हे पुरावे आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची शाळा घेणं असो, आठवड्याभरातील सदस्यांच्या वागणुकीवर त्याने घेतलेली हजेरी असो किंवा आपल्या हटके स्टाईलने सदस्यांचं भरभरून केलेलं कौतुक असो…या साऱ्याच गोष्टी ‘बिग बॉस मराठी’चा प्रेक्षकवर्ग वाढवण्यात कारणीभूत ठरत आहेत. एक भाऊचा धक्का संपल्यावर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर काय होणार याची ‘बिग बॉस’प्रेमींमध्ये असणारी उत्सुकता हेच या नव्या सीझनच्या यशाचं गुपित आहे. नव्या सीझनमधील नावीन्य आणि तरुणपण प्रेक्षकांना जास्त आकर्षित करत आहे.

follow us