Bigg Boss Marathi: ‘माझा लय गावठी पॅटर्न हाय’; गोलीगत सूरज चव्हाण असं का म्हणाला?

Bigg Boss Marathi: ‘माझा लय गावठी पॅटर्न हाय’; गोलीगत सूरज चव्हाण असं का म्हणाला?

Bigg Boss Marathi New Season Day 20 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi) रिल्स स्टार गोलीगत सूरज चव्हाणला (Suraj Chavan) प्रेक्षक आणि अनेक कलाकार सपोर्ट करत आहेत. (Bigg Boss Marathi New Season) त्याला सुरुवातीला खेळ समजत नव्हता. पण आता त्याने खेळ समजून घेऊन मैदानात उडी मारली आहे. “माझा लय गावठी पॅटर्न हाय”, असं सूरज आज (Suraj Chavan) म्हणताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


सूरज चव्हाणचा साधेपणा ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आजच्या भागात वर्षा ताई सूरजचं कौतुक करत त्याला सांगत आहेत,”खूप छान खेळलास”. यावर सूरज म्हणतोय, मला तो थांबवत होता तेव्हा खूप चिड येत होती…मी लय गावठी पॅटर्न हाय”. सूरजचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

सदस्यांना मिळाली फळांची मेजवानी

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ग्रुप B च्या सदस्यांना आज फळांची मेजवानी मिळणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) ग्रुप B मधील सदस्य अनेकदा पिकनिकला आल्यासारखे गार्डन एरियामध्ये गप्पा मारताना दिसून येतात. आज त्यांना ‘बिग बॉस’तर्फे खास फळं मिळणार आहेत.

सदस्यांना अश्रूंचा बांध फुटला

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं स्वाभाविक आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, “सदस्यांनी साधला जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद”. बिग बॉस मराठी’चा आजचा भाग पाहताना ‘बिग बॉस’ प्रेमींना देखील अश्रू अनावर होणार आहेत. नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi : सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! पाहा कसा भिडतोय टास्कमध्ये

‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube