Bigg Boss Marathi : सूरजच्या गोलीगत पॅटर्नची बातच न्यारी! पाहा कसा भिडतोय टास्कमध्ये…
Bigg Boss Marathi New Season Day 20 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा (Bigg Boss Marathi) सीझन सध्या चांगलाच गाजतोय. यंदाच्या सीझनमध्ये काही वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. (Bigg Boss Marathi New Season) यातील काही किएटर्स आहेत कर काही अभिनेते. दिवसेंदिवस हे किएटर्स कलाकारांवर भारी पडताना दिसत आहेत. यातीलच एक सर्वांच्या ओळखीचा चेहरा म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण (Suraj Chavan).
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’चा आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं आहे. सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये “माझं मी बघेन”, म्हणत निक्की, अरबाज (Arbaaz Patel ) आणि जान्हवी या तगड्या सदस्यांसोबत सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे.
सूरज चव्हाण आता आपले खरे रंग दाखवताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. बिग बॉस मराठीच्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सूरजचं चांगलच कौतुक होत आहे.
जेवणावरुन आर्याचा डीपीसोबत झालाय कल्ला
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी आर्याला म्हणतोय, “मला असं वाटतं की तु कमी खावं”. त्यावर आर्या म्हणते, “माझ्या जेवणावर कमेंट करायची नाही… मी एकदा जेवण करेल..दोनदा जेवण करेल..तुम्ही मला सांगू नका. त्यावर धनंजय आर्याला म्हणतो,”तू तोंड बंद कर मग”. तर आर्या तोंड बंद करण्यास नका देते. यावर धनंजय तिला म्हणतो, “मग मी तुला खाताना बोलणार”.
Bigg Boss Marathi: ‘तोंड बंंद कर तुझं!’ जेवणावरुन आर्याचा डीपीसोबत झालाय कल्ला
तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना आणखी कोणते नवे टास्क देणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो पाहता येईल. तसेच Jio Cinema वरदेखील या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहता येतील.
‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.