Bigg Boss Marathi : सूरजला समजावण्याचा DP चा तिखट कोल्हापुरी अंदाज पाहिलात का?

Bigg Boss Marathi : सूरजला समजावण्याचा DP चा तिखट कोल्हापुरी अंदाज पाहिलात का?

Bigg Boss Marathi New Season Day 19 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नव्या सीझनमधील सदस्य दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली मजामस्ती यांमुळे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. (Bigg Boss Marathi New Season)आजच्या भागात सूरज चव्हाणला (Suraj Chavan) समजावण्याचा धनंजय पोवारचा (Dhananjay Powar) तिखर कोल्हापुरी अंदाज पाहायला मिळणार आहे.

आजच्या भागात डीपी सूरजला समजावत म्हणतोय,”स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे. उद्या आमच्यात खेळताना समोर अरबाज, वैभव कोणीही असले तरी असं खेळू नको. सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. खेळात छान खेळलं पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


सूरज सांगतोय त्याला मिळालेल्या गोलीगत धोक्याबद्दल

निक्की आणि घन:श्यामला आजच्या भागात सूरज त्याला मिळालेल्या गोलीगत धोक्याबद्दल सांगणार आहे. त्यावर निक्की विचारते, “तुला कोणी बुक्कीत टेंगुळ तर दिलं नाही ना?”. सूरज म्हणतो, “माझ्यासोबत चांगली राहायची, बोलायची वगैरे… पण तिला दुसरा चांगला मुलगा मिळाला आणि तिने मला सोडलं. गोलीगत धोका दिल्याने मला खूप राग आला होता. त्यानंतर मी लोकांच्या मनावर राज्य केलं”.

निक्की आणि अरबाजमध्ये कोणामुळे उडतायेत खटके?

निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. प्रोमोमध्ये निक्की अरबाजला हात जोडून विनंती करत म्हणतेय,”अरबाज घराकडे जा…माझ्याकडे येऊ नको”. पुढे अरबाज निक्कीला म्हणतो,”तुझ्यासोबत जसं मी वागतो तसचं आता मी त्याच्यासोबत वागणार”. त्यानंतर निक्की घन:श्याम आणि वैभवला म्हणते,”अरबाज ‘त्या’ मुलीकडे कसा जाऊ शकतो? ज्या मुलीच्या विरोधात मी गेले होते. त्याला ट्रॉफी द्या नाहीतर वेड लागेल त्याला”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वादाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सगळे सदस्य आता आपल्या मुद्द्यासाठी भांडत आहेत. सदस्यांचे खरे रंग आता प्रेक्षकांना दिसायला लागले आहेत.

Bigg Boss Marathi: निक्की आणि अरबाजमध्ये कोणामुळे उडतायेत खटके? जाणून घ्या

‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube