Download App

Bigg Boss Marathi: सगळे जाणार पाताळलोकात शोधायला सोन्याची नाणी, कोण कोणावर पडणार भारी?

Bigg Boss Marathi New Season Day 33 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात ( Bigg Boss Marathi New Promo) कधी काय राडा होईल सांगता येत नाही.

Bigg Boss Marathi New Season Day 33 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी काय राडा होईल सांगता येत नाही. (Bigg Boss Marathi New Season) आज घरातील सर्व मंडळी पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. (Bigg Boss Marathi ) यात कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचच लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. टीम A विरुद्ध टीम B असा हा टास्क पार पडणार आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कमाल टास्क पार पडणार आहे. प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo ) म्हटलं जात आहे,”पाताळलोकात सदस्यांना शोधावी लागणार सोन्याची नाणी”. दरम्यान टास्कमध्ये अरबाज (Arbaaz) आर्याला म्हणतोय,”आर्या (Arya) आपले कमी आहेत..लवकर नाणी आण”. दरम्यान कॅप्टन निक्की मात्र टीम B ची नाणी वॅलिड नाही असं म्हणते. यावर डीपी दादा (DP Dada) म्हणतात,”खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर”. तर अभिजीत म्हणतो,”यापुढे मला पार्टनर बनयाचं नाही”. अभिजीतच्या (Abhijeet) या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचं कौतुक करत त्याला सॅल्युट देताना दिसून येतात. अभिजीत आणि निक्कीची एक जोडी होती. पण आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्याने त्याने तिला सोडलं असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

गोलीगत सूरज बनलाय भावजी

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कालच्या भागात खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेचा धमाल किचन ड्रामा पाहायला मिळाला. तर गोलीगत सूरज भावजी मात्र दुरून मजा घेताना दिसून आले. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सूरज वर्षाताईंना म्हणतोय,”आई या वहिनींना सांग जरा”. त्यावर अंकिता म्हणते,”भावजी लावलं की नाही सासूबाईंना कामाला”. त्यावर वर्षा ताई म्हणतात,”आता मी सूनबाईंना कामाला लावणार आहे”. अंकिता म्हणते,”मी कामं करणारच नाही..माझी मर्जी”. पॅडी म्हणतो,”भावजी भावजी मिठाचा खोका… भावजींच्या मिशीवर बसला बोका”.

किचनमधल्या कामावरून खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेची चांगलीच धमाल सुरू आहे. अंकिता आणि वर्षा ताईंचे ‘तू तू मैं मैं’ पाहणं प्रेक्षकांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे.

Bigg Boss Marathi: कोणी प्रेमाला ठोकर मारणार तर कोणी पस्तावणार, घरात नवीन समीकरण तयार होणार?

घरात नवीन समीकरण तयार होणार?

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये सूरज आणि आर्या निक्की, अरबाज, अभिजीत यांच्यातील नात्यांवर एक खास गाणं म्हणताना दिसून येत आहेत. त्यावर घरातील इतर सदस्यही मजा घेताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज चांगलाच माहोल बनणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता किती दिवस निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. पण त्यांची दिल दोस्ती दुनियादारी मात्र लक्ष वेधून घेत आहे.

follow us