Download App

Bigg Boss Marathi : सूरज आणि पॅडीची जोडी भेदू शकेल का घरातील महाचक्रव्युह?

Bigg Boss Marathi Season 5 Day 60 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5 ) घरात दररोज नव-नवे टास्क पार पडताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Day 60 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज नव-नवे टास्क पार पडताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi Season 5 ) प्रत्येक दिवशी काय नवीन घडणार याकडे रसिकांचे लक्ष लागून आहे. (Bigg Boss Marathi) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टास्कचा महाबाप येणार असल्याचे बोलले जात असून याचा एक प्रोमो (Bigg Boss Marathi New Promo) नुकताच प्रदर्शित झाला आहे. जिंकण्यासाठी सदस्यांना महाचक्रव्युह पार करावे लागणार आहे.


आता समोर आलेल्या प्रोमोत तुम्ही पाहू शकता की, पॅडी भाऊ (Paddy Dada) आणि सूरज (Suraj Chavan) या महाटास्क खेळताना दिसत आहेत. या महाचक्रव्युहात सूरज डोळ्याला पट्टी बांधून पॅडी भाऊंनी सांगितलेल्या सूचना ऐकून तशी कृती करताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता या महाचक्रव्युहात कोणती जोडी धमाका करणार? आणि कोण टास्क गाजवणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आजच्या भागात हा टास्क पाहताना नक्कीच प्रेक्षकांना मज्जा येणार आहे.

जिंकण्यासाठी पार करावं लागणार महाचक्रव्युह

प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”बिग बॉस मराठी’च्या या सीझनच्या विजेत्याला मिळणारी बक्षिसांची रक्कम आहे 25 लाख रुपये. ही प्राईज मनी कमावण्यासाठी मी आणलाय या सीझनमधील सर्व टास्कचा बाप ‘महाचक्रव्युह’. दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे चेहरे पाहण्याजोगे आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात महाचक्रव्युहात कोणते सदस्य धमाका करणार? आणि कोण टास्क गाजवणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. त्यामुळे आजच्या भागात हा टास्क पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल. त्यामुळे आजचा भाग पाहायला विसरू नका.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्की अभिजीतला शिकवतेय चहा बनवायला

अंकीताने केली DP दादांची थट्टा

UNSEEN UNDEKHA’ मध्ये तुम्ही पाहू शकता, DP दादा आणि अंकीता गार्डन एरियात बसले असताना DP दादा अंकीताला बहिणीच्या प्रेमाबद्दल सांगताना म्हणाले,”38 वर्षांमध्ये जे प्रेम मी माझ्या बहिणींना दिले तेच प्रेम मी इथे या घरात फील केले. या सगळ्यांचे क्रेडिट धनंजय पोवार यांना जाते.” यावर अंकीता म्हणाली,”या सगळ्यांचे क्रेडिट तुम्हाला नाही मला जाते. माझ्या सारखी एखादी चांगली मुलगी तुम्हाला जर या घरात मिळाली नसती तर तुमचे प्रेम कसे जागरूक झाले असते? एक भावाला त्याच्या भावना जागरूक करण्यासाठी माझ्या सारख्या एका बहिणीला या घरात यावे लागले. माझ्या सारखी बहीण तुम्हाला पुर्ण कोल्हापूरात सापडली नसती.” यावर DP दादा म्हणाले,” कोल्हापूरमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात पण सापडली नसती.”

पुढे अंकीता म्हणाली,”दादा पण मी तुम्हाला लाभली. मी तुम्हाला शिकवले कसे रडणाऱ्या बहिणीचे सांत्वन कसे करायचे.तिला आधार कसा द्यायचा म्हणून आज तुम्ही खंभीर होऊन डम्बल उचलू शकतात. नाहीतर या घरात तूम्ही आज लोळत पडला असता किंवा शौच्यालयात झोपताना दिसला असता. पण मी तुमचे भांडे फोडले आणि त्यामुळे कळले.”

follow us