Download App

Bigg Boss Marathi: घरात रंगणार लगोरीचा खेळ; अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये होणार जोरदार राडा

Bigg Boss Marathi Season 5 Day 60 : ‘बिग बॉस मराठी’ चा हा सीझन सतत चर्चेत असतो. या सीझनमधील टास्कही चर्चेत असतात.

Bigg Boss Marathi Season 5 Day 60 : ‘बिग बॉस मराठी’ चा हा सीझन सतत (Bigg Boss Marathi Season 5 ) चर्चेत असतो. या सीझनमधील टास्कही चर्चेत (Bigg Boss Marathi) असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील लयभारी खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात (Bigg Boss Marathi New Task) नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. आज घरात लगोरीचा खेळ खेळला जाणार आहे.


बिग बॉस मराठीच्या घरात आज खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळात अंकिता (Ankita Walawalkar) आणि वर्षा ताईंमध्ये (Varsha Usgaonkar) चांगलीच लढत होणार आहे. त्यांच्यामध्ये होणारी खेचाखेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या रंगतदार टास्कमध्ये कोण बाजी मारणार हे पाहावे लागेल.

‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये मानाची ट्रॉफी पटकावण्यासाठी आजपासून चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. आपल्या खेळाबद्दल सदस्य एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi: अरबाजच्या एक्झिटमुळे निक्कीचा झाला आहे इमोशनल ब्रेकडाऊन

आज खेळला जाणार लगोरीचा खेळ

बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोममध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”आज खेळूया माझी लगोरी”. त्यानंतर घरातील सर्व सदस्य जीव ओतून टास्क खेळताना दिसत आहेत. निक्की म्हणतेय,”माझ्याशी पंगा महागात पडेल”. तर डीपी दादा म्हणतोय,”तोंडं शिवा आणि वर बसा”. दरम्यान जान्हवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या लगोरी खेळात कोण विजयी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. आजपासून सर्वच सदस्य एका वेगळ्या पद्धतीने आपला खेळ खेळताना दिसणार आहेत. आजचा लगोरी स्पेशल भाग नक्की पाहा.

follow us